कैरीचा चेंडू, बैलगाडीच्या काठ्यांना स्टम्प करून केली खेळण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:32 AM2018-05-29T00:32:07+5:302018-05-29T00:32:49+5:30

बालपणी आंब्याच्या झाडावरील कैरीचा उपयोग चेंडू आणि बैलगाडीच्या धुरीला बांधलेल्या दोन काठ्यांचा स्टम्प म्हणून उपयोग करून आपल्या क्रिकेट खेळास सुरुवात झाली; परंतु खऱ्या अर्थाने कलाटणी ही औरंगाबाद येथे झाल्याचे मत मराठवाड्यातील माजी भारतीय कसोटीपटू व सध्या टीम इंडियाचा बॅटिंग कोच असणाºया संजय बांगर याने व्यक्त केले. भविष्यात औरंगाबादेत क्रिकेटमध्ये योगदान देणार असल्याचा शब्दही संजय बांगर याने यावेळी उपस्थिताना दिला.

Stretching the Carri ball, the bullock cart, began to play | कैरीचा चेंडू, बैलगाडीच्या काठ्यांना स्टम्प करून केली खेळण्यास सुरुवात

कैरीचा चेंडू, बैलगाडीच्या काठ्यांना स्टम्प करून केली खेळण्यास सुरुवात

googlenewsNext
ठळक मुद्दे संजय बांगर म्हणतोय...: औरंगाबादसाठी भविष्यात वेळ देणार

औरंगाबाद : बालपणी आंब्याच्या झाडावरील कैरीचा उपयोग चेंडू आणि बैलगाडीच्या धुरीला बांधलेल्या दोन काठ्यांचा स्टम्प म्हणून उपयोग करून आपल्या क्रिकेट खेळास सुरुवात झाली; परंतु खऱ्या अर्थाने कलाटणी ही औरंगाबाद येथे झाल्याचे मत मराठवाड्यातील माजी भारतीय कसोटीपटू व सध्या टीम इंडियाचा बॅटिंग कोच असणाºया संजय बांगर याने व्यक्त केले. भविष्यात औरंगाबादेत क्रिकेटमध्ये योगदान देणार असल्याचा शब्दही संजय बांगर याने यावेळी उपस्थिताना दिला.
औरंगाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (ए. एम.ए.) यांच्यातर्फे रेअर-शेअरच्या कार्यक्रमासाठी तो येथे आला होता. याप्रसंगी त्याने बालपण, आणि औरंगाबाद ते भारतीय संघातील समावेश यापर्यंतचा आपला प्रवास उलगडला. याप्रसंगी तो म्हणाला, ‘‘बालपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजी-आजोबांकडे जायचो. शेतात गेल्यानंतर बैलगाडीच्या धुरीला बांधलेल्या दोन काठ्यांना यष्टी करायचो आणि कैरीचा चेंडू म्हणून उपयोग करून आपण खेळण्यास सुरुवात केली; परंतु खेळाडू म्हणून खºया अर्थाने कलाटणी मिळाली ती पायोनिर्स क्लबमध्ये गेल्यानंतर. त्यांच्या ट्रायल्समध्ये पॅड व ग्लोव्हज न घालता फलंदाजी केली. या क्लबमध्ये सुनील गावसकर यांना मार्गदर्शन करणारे वसंत अलमाडी यांच्याकडून क्रिकेटचे ज्ञान आणि फलंदाजीचे कौशल्य शिकलो. त्यानंतर किरण जोशी आणि धांडे यांच्या सल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील ट्रायल्ससाठी गेलो होतो.’’ विशेष म्हणजे संजय बांगरने १९८७-८८ साली महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. प्रशिक्षक किरण जोशी यांनी प्रगतीसाठी मला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. आई-वडिलांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. मुंबईत गेल्यानंतरच आपण कोठे आहोत हे आपल्याला समजले. त्यानंतर आपला खेळ उंचावला. १९ वर्षांखालील मुंबईचे आणि मुंबई विद्यापीठाचेही प्रतिनिधित्व केले, असे बांगर म्हणाला.
आपली गोलंदाजी हे संघ निवडताना नेहमीच वरदान ठरल्याचे संजय बांगरने या वेळी सांगितले. याचा किस्सा सांगताना बांगर म्हणाला, एसेक्सविरुद्ध शिवसुंदर दास आणि मला सलामीला पाठविण्यात आले. या सामन्यात शिवसुंदर दासने २६२ आणि मी ७१ धावा केल्या; परंतु गोलंदाजीची माझी जमेची बाजू पाहता मला भारतीय संघात संधी मिळाली. उदयोन्मुख खेळाडूंनी मोठे स्वप्न पाहावे, असे सांगतानाच आपल्याला वाचनाचीही आवड होती. सुनील गावसकर यांचे आत्मचरित्र, मृत्युंजय, शिवाजी महाराज, संभाजी राजे यांच्यावरील पुस्तके आणि गीता वाचायचो आणि त्यातून बरेच शिकलो असल्याचे बांगरने सांगितले.
यावेळी ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुनील देशपांडे यांनी केले. यावेळी एएमएचे अध्यक्ष सतीश कागलीवाल, चेअरमन सी. पी. त्रिपाठी, डॉ. उल्हास शिऊरकर, संजय बांगर याचे मार्गदर्शक किरण जोशी आदी उपस्थित होते.

संघर्षही एन्जॉय केला
देशाकडून खेळण्याचे आपले स्वप्न होते. मुंबईला प्रदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सल्ल्यानुसार रेल्वेत जॉइन झालो. रेल्वे ही माझ्यासाठी शिक्षण देणारी शाळा ठरली. तेथे विविध लोकांचा संपर्क यायचा. त्यावेळच्या पहिल्या सीझनमध्ये एकच सामना खेळायला मिळाला.
दुसºया हंगामासाठी निवड झाली. दिल्ली येथील कर्नेलसिंग स्टेडियमवर सामना होता. तेथील तापमान १० डिग्री सेल्सिअस, सर्वच असुविधा अशा प्रतिकूल परिस्थितीतूनही आम्ही शिकलो आणि हा संघर्षदेखील आम्ही एन्जॉय केला.
वयाच्या २९ व्या वर्षी भारतीय संघाकडून संधी मिळाली. त्याआधी विदर्भाविरुद्ध नागपूरला ४ विकेटस् घेतल्या. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध अध्यक्षीय संघात निवड झाली. त्या सामन्यात घेतलेल्या ७ बळींची छाप निवड समितीचे शिवलाल यादव यांच्यावर पडली. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघात निवड झाली.
अध्यक्षीय संघाकडून खेळताना पायाचा घोटा दुखावला. त्यामुळे कसोटीत ५ षटकेच गोलंदाजी केली आणि दुखापत असतानाही शिवदास सुंदरला रनर म्हणून खेळत ३६ धावांची खेळी केली.’’
दुखापतीनंतर बांगरने पुनरागमन करताना झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या दुसºयाच कसोटीत ७ व्या क्रमांकावर येऊन शतक ठोकले. २00२ मध्ये हेंडिग्ले येथे इंग्लंडविरुद्ध ६८ धावांची खेळी केली.

Web Title: Stretching the Carri ball, the bullock cart, began to play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.