जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी थांबवा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:40 PM2018-11-28T17:40:55+5:302018-11-28T17:41:27+5:30

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन सध्या शेती व परळी थर्मलसाठी पाणी सोडले आहे.

Stop the water released from the left canal of Jaikwadi; Movement of Swabhimani Shetkari Sanghatana | जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी थांबवा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन  

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी थांबवा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन  

googlenewsNext

जायकवाडी (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन सध्या शेती व परळी थर्मलसाठी पाणी सोडले आहे. यामुळे धरण साठा कमी होत असल्याने ते त्वरित बंद करावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी आंदोलन केले. 

20 सप्टेंबर पासून  जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातुन 1200 क्युसेक वेगाने शेती, परळी थर्मल व परभणीकडे पाणी सोडण्यात आले आहेत. यामुळे धरण साठ 27 टक्यावर आला असून हे पाणी तत्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. अद्नोल्कानी पैठण-औरंगाबाद रोड वरील कातपुरजवळील डाव्या कालव्यावर जाऊन आंदोलन केले. यानंतर अधिक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी आंदोलकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून पाणी दोन दिवसात बंद करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच आज 400 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येईल अशी माहिती दिली शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

Web Title: Stop the water released from the left canal of Jaikwadi; Movement of Swabhimani Shetkari Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.