ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्ता रोको

By Admin | Published: August 24, 2014 01:01 AM2014-08-24T01:01:43+5:302014-08-24T01:49:39+5:30

सेनगाव-रिसोड रस्त्यावर सावरखेडा पाटीवर आज ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

Stop the path of water from the villagers | ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्ता रोको

ग्रामस्थांचा पाण्यासाठी रास्ता रोको

googlenewsNext

सेनगाव : अर्धवट कामामुळे जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना सहा वर्षापासून बंद आहे. गावात तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई निर्माण झाली असताना प्रशासन कुठलीच उपाययोजना करीत नसल्याने सेनगाव-रिसोड रस्त्यावर सावरखेडा पाटीवर आज ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.
सावरखेडा येथे २७ लाख रुपये निधी खर्च करीत जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेचे काम सहा वर्षांपूर्वी करण्यात आले. संबंधितांनी निधीची उचल केली; परंतु नळ योजनेचे काम अर्धवट केल्याने या योजनेचा गावाला अद्यापपर्यंत कुठलाच फायदा झाला नाही. गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना भटकंती करावी लागत असताना कुठल्याच स्वरुपाच्या उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे शुक्रवारी मनसेचे पंचायत समिती सदस्य विकास शिंदे यांच्या नेतृत्वासाठी ग्रामस्थांनी सावरखेडा पाटीवर ११ ते १ या दरम्यान दोन तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सेनगाव-रिसोड राज्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांची बीडीओ पंकज राठोड यांनी भेट घेवून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. या आंदोलनात पं.स. सदस्य शिंदे यांच्यासह सरपंच गजानन कुहिटे, प्रकाश पाटील, भागवत मुढे, केशव पवार, नारायण आवटे, संतोष डाखुरे, संतोष नरवाडे, रामेश्वर गव्हाणे, गजानन आवटे, एकनाथ मुकीर, विजय धाकतोडे, सुनील शिंदे, प्रवीण शिंदे आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the path of water from the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.