सोयाबीन उत्पादनात ५० टक्क्यांची घट !

By Admin | Published: October 25, 2014 11:45 PM2014-10-25T23:45:50+5:302014-10-25T23:48:58+5:30

लातूर : खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाने दिलेली उघडीप. त्यातच दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पावसावर बळीराजाने पेरणी केली. परंतु, आहे

Soybean production drops by 50% | सोयाबीन उत्पादनात ५० टक्क्यांची घट !

सोयाबीन उत्पादनात ५० टक्क्यांची घट !

googlenewsNext


लातूर : खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाने दिलेली उघडीप. त्यातच दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पावसावर बळीराजाने पेरणी केली. परंतु, आहे त्या पिकालाही पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्हाभरातील ३ लाख ५ हजार हेक्टर्सवरील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़
लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात उशिरा पाऊस झाला. झालेल्या अल्पश: पावसावर हायब्रीड ज्वारी, तूर, साळ, हरभरा आदी पिकांची पेरणी झाली़ परंत,ु उशिरा झालेल्या पावसामुळे इतर पिकांच्या प्रमाणात सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली़ त्यातच लातूर जिल्ह्यातील अनेक गावात सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही़ तर काही ठिकाणी आहे त्या सोयाबीनच्या पिकाला पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ३ लाख ५ हजार हेक्टरवरील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ दुसऱ्या टप्प्यात पाऊस न झाल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले आहे़ तर काही हलक्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही निघालेला नाही़ गतवर्षी सोयाबीनच्या एका बॅगला बारा पोते उतार होता. परंतु, यावर्षी मात्र प्रती बॅगला सहा पोते उतार येत असल्याने शेतकऱ्याला अनंत अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ शेती निसर्गावर अवलंबून आहे़ निसर्गाने साथ दिली तर शेतकरी सुखी व निसर्गाने साथ नाही दिल्यास शेतकऱ्यासह सर्वच दुखी अशी परिस्थिती निर्माण होते़ परंतु, यावर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे़
सोयाबीन हे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या पेऱ्यात इतर पिकाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली़ परंतु, उशिरा झालेला पाऊस व कमी पाऊस यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही़ लातूरच्या बाजापेठेत आहे त्या सोयाबीनलाही ३ हजार ५० रूपये क्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे़ (प्रतिनिधी)४
शेतकऱ्याने इतर पिकापेक्षा नगदी पीक म्हणून इतर पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु, निसर्गाच्या अवकृपेमुळे काही ठिकाणी सोयाबीन उगवले नाही तर काही ठिकाणी आलेल्या सोयाबीनच्या उत्पादनातून उत्पादनखर्चही निघत नसल्याने अनंत अडचणीला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया रेणापूर तालुक्यातील पळशी येथील भरत जाधव या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे़
४जिल्ह्यात ३ लाख ५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांचे पावसाअभावी उत्पादन निम्म्यावर आलेले आहे़ ज्या शेतकऱ्याला गतवर्षी एका बॅगला बारा पोते होत होते, त्या शेतकऱ्याला सहा पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे़ परिणामी, सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक टी़एस़ मोटे यांनी सांगितले़

Web Title: Soybean production drops by 50%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.