निविदांवरून धुसफूस

By Admin | Published: September 1, 2014 01:05 AM2014-09-01T01:05:41+5:302014-09-01T01:09:00+5:30

लातूर : लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने विकासकामांचा सपाटा लावला आहे़ दहा दिवसांपूर्वी स्थायी समितीने १३३ कोटी रुपयांच्या कामांसाठी मागविण्यात आलेल्या निविदेला केवळ अर्ध्या तासात मंजुरी दिली़

Smile on tuition | निविदांवरून धुसफूस

निविदांवरून धुसफूस

googlenewsNext


लातूर : लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने विकासकामांचा सपाटा लावला आहे़ दहा दिवसांपूर्वी स्थायी समितीने १३३ कोटी रुपयांच्या कामांसाठी मागविण्यात आलेल्या निविदेला केवळ अर्ध्या तासात मंजुरी दिली़ त्यानंतर शनिवारी झालेल्या स्थायी बैठकीतही ३ कोटी १४ लाखाच्या निविदेला मंजुरी देत लागलीच वर्क आॅर्डर काढण्याचा ठराव मांडला़ प्रत्येकी ५० लाखाच्या कामाचे पाच टेंडर निघणार असून यात ‘मॅनेज’ सिस्टीम राबविण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकाने केला आहे़
लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात मनपाने विविध कामे हाती घेतली आहेत़ मिनी मार्केट ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते पीव्हीआर चौक रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या़ ३ कोटी ३४ लाखांचा निधी असलेल्या या कामासाठी धनचंद्र कन्स्ट्रक्शन, वैशाली कन्स्ट्रक्शन, रेड्डी कन्स्ट्रक्शन, खतीब कन्स्ट्रक्शन यांनी निविदा भरली होती़ चार कंत्राटदारांपैकी वैशाली कन्स्ट्रक्शनची निविदा तांत्रिक तपासणीत बाद ठरली़ धनचंद्र कन्स्ट्रक्शनने अबोव्ह ९़९८, खतीब कन्स्ट्रक्शनने १५़८९ निविदा भरली होती़ रेड्डी कन्स्ट्रक्शनची निविदा आलेली असतानाही ती ओपन करण्यात आली नाही़ या दोन कंत्राटदारांपेक्षा रेड्डी कन्स्ट्रक्शनचा निविदा कमी दरात आहे, असा दावा नगरसेवक राहुल माकणीकर यांनी केला आहे़ राजकीय वरदहस्त असलेल्या बड्या कंत्राटदाराची निविदा मनपा प्रशासनाने मंजूर करण्याचा घाट घातल्याचा आरोप करीत माकणीकर यांनी केला. नियम डावलून मनपा प्रशासन राजकीय दबावापोटी मर्जीच्या कंत्राटदाराला कामे वाटप करीत असल्याचा आरोप केला जात आहे़ निविदा आॅनलाईन असल्या तरी त्या मॅनेज केल्या जात असल्याचा आरोप माकणीकर यांनी केला आहे़ ३ कोटी ३४ लाख खर्च करून मिनी मार्केट ते पीव्हीआर चौक मार्गावरील चौदपरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे़ हा कामाच्या निविदेला सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार असून लागलीच वर्कआॅर्डर देण्याच्या हालचाली सुरू आहेत़ (प्रतिनिधी)
मिनी मार्केट ते पीव्हीआर चौक या मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी ४ कंत्राटदारांनी निविदा भरली होती़ या प्रक्रियेत रेड्डी कन्स्ट्रक्शन यांनीही सहभाग घेतला होता़ त्यांचे टेक्निकल निविदा पात्र ठरली आहे़ मात्र, फायनन्सियल निविदा उघडण्यास प्रशासन दबावापोटी तयार नाही़ ही निविदा उघडून बघितल्यास त्यात मनपाचे किमान ४० ते ५० लाख रूपये वाचतील, ही बचत दिसून न आल्यास मी नगरसेवक पदाचा राजीनामा देईऩ अन्यथा मनपा आयुक्तांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान नगरसेवक राहुल माकणीकर यांनी दिले आहे़
२६ आॅगस्ट रोजी रेड्डी कन्स्ट्रक्शनच्या वतीने मनपा आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे़ त्यात त्यांनी प्रकृती चांगली नसल्यामुळे सदरील कामाकडे लक्ष देवू शकत नाही, असे वाटत असल्यामुळे मी सदरील निविदेमध्ये भाग घेऊ शकत नाही, म्हणून माझी निविदा उघडू नये या निविदेवर माझा कसलाही आक्षेप राहणार नाही, असे पत्रात नमूद केले आहे़

Web Title: Smile on tuition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.