शिवसेनेची ‘एकला चलो रे’ची भूमिका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 09:25 PM2018-04-19T21:25:53+5:302018-04-19T21:51:40+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या लोकसभा, विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याचा केलेला निर्धार कायम आहे.

The role of Shiv Sena's 'Ekla Chalo Re' has remain constant | शिवसेनेची ‘एकला चलो रे’ची भूमिका कायम

शिवसेनेची ‘एकला चलो रे’ची भूमिका कायम

googlenewsNext

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या लोकसभा, विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याचा केलेला निर्धार कायम आहे. मराठवाड्यातील लोकसभा आणि विधासनसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आणि पक्षा परिस्थितीचा ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत आढावा घेतला.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना पक्षाच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे शिवसेना प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत ‘एकला चले रो’ची घोषणा केली होती. यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला गोंजारणे सुरू केले होते. तसेच भाजपा शिवसेनासोबत युती करण्यास इच्छुक असल्याचेही स्पष्ट केले. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ‘स्वबळा’चा नारा कायम असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातुर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाचा आढावा ठाकरे यांनी घेतला. मागील दिड महिन्यांपूर्वी शिवसेनेतर्फे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निरिक्षक पाठवून परिस्थितीची पाहणी केली होती. याचे अहवालही आजच्या बैठकीत पक्षप्रमुखांना सादर करण्यात आले. यात प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील इच्छुक, त्यांची ताकद, पक्षाची ताकद किती आहे, याची माहिती सादर केली. याशिवाय पक्षप्रमुखांनी संबंधित जिल्ह्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्याशी संभाव्य नावांबाबतही माहिती जाणून घेतली आहे.

अनेक पदाधिकाऱ्यांची दांडी
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. मात्र या बैठकीला अनेक जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली असल्याचे दिसून आले. यात प्रामुख्याने उस्मानाबादचे खासदार प्रा. रवि गायकवाड यांचा समावेश होता.

Web Title: The role of Shiv Sena's 'Ekla Chalo Re' has remain constant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.