महापालिकेची घर पाडण्याची नोटीस रद्द करून देतो, म्हणत घरात घुसलेल्या एकाचा विवाहितेचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 07:46 PM2019-01-02T19:46:06+5:302019-01-02T19:46:39+5:30

आपले घर पाडले जाणार, या भितीपोटी पीडितेसह तिचे कुटुंब चिंताग्रस्त बनले होते.

rape on women by giving fake promise of dismissal of cancellation of municipality notice | महापालिकेची घर पाडण्याची नोटीस रद्द करून देतो, म्हणत घरात घुसलेल्या एकाचा विवाहितेचा अत्याचार

महापालिकेची घर पाडण्याची नोटीस रद्द करून देतो, म्हणत घरात घुसलेल्या एकाचा विवाहितेचा अत्याचार

googlenewsNext

औरंगाबाद: विना परवाना बांधकाम केल्याची महापालिकेने पाठविलेली नोटीस रद्द करून देतो, असे सांगत घरात घुसलेल्या ओळखीच्या तरूणाने विवाहितेवर बलात्कार केला. याबाबत कोठेही वाच्यता केल्यास, जीवे मारेल, अशी धमकी देऊन आरोपी पळून गेला. ही खळबळजनक घटना, २६ डिसेंबर रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान बेगमपुरा परिसरात घडली. या घटनेने घाबरलेल्या पीडितेने घटनेनंतर चार दिवसांनी १ जानेवारी रोजी बेगमपुरा ठाण्यात फिर्याद नोंदविली. आरोपी महापालिकेशी संबंधित असावा, असा अंदाज पोलिसांना आहे. 

याविषयी बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, महापालिकेची परवानगी न घेता घराचे बांधकाम करणाऱ्या बेगमपुरा परिसरातील अनेक घरमालकांना महापालिकेने नोटीसा पाठविल्या आहेत. घरे अनधिकृत असल्याचे त्यात नमूद होते. बेगमपुरा परिसरातील रहिवासी ४५ वर्षीय पीडितेलाही महापालिकेची नोटीस प्राप्त झाली होती. तेव्हापासून आपले घर पाडले जाणार, या भितीपोटी पीडितेसह तिचे कुटुंब चिंताग्रस्त बनले होते.

महिनाभरापूर्वी जाधव नावाच्या एका व्यक्तीसोबत तिची ओळख झाली होती. त्यावेळी तुमच्या घराचे काम करून देतो, असे तो पीडितेला म्हणाला होता. तुम्हाला आलेली नोटीस मला दाखवा,असे तो म्हणाला होता. तोंड ओळख असलेला जाधवचे पूर्ण नावही पीडितेला माहिती नाही. तो तिला अधून-मधून मोबाईलवर बोलत. २६ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास पीडितेचा पती कामावर होता. पीडिता घरी एकटीस असल्याची संधी साधून जाधव बळजबरीने पीडितेच्या घरी गेला. तुमच्या घराचे काम करून देतो, असे म्हणून त्याने तिला आतल्या खोलीत ओढत नेत तिचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरी केली. अचानक झालेल्या या अत्याचारामुळे पीडिता प्रचंड घाबरली. तिला जीवे मारण्याची धमकी देत आरोपी तेथून निघून गेला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी सांगितले. 

Web Title: rape on women by giving fake promise of dismissal of cancellation of municipality notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.