पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:00 AM2018-12-29T00:00:31+5:302018-12-29T00:00:45+5:30

पाच जिवंत काडतुसे जप्त : सिल्लोड तालुक्यातील घटना

 The pistol caught a young man | पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास पकडले

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणास पकडले

googlenewsNext

सिल्लोड : गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन फिरणाºया तालुक्यातील कासोद येथील तरुणाला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता रेलगाव फाट्यावर पकडले.
गजानन माधवराव कुमावत (२४, रा. कासोद) असे आरोपीचे नाव आहे. औरंगाबाद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव, जमादार जोशी, देशमुख, गांगवे, तांदळे यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पिस्टल, काडतुसे असा ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि. विश्वास पाटील हे करीत आहेत. आरोपीला सिल्लोड न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. ३१) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Web Title:  The pistol caught a young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.