निलंग्यात भाजपाची टक्केवारी २७़१६

By Admin | Published: October 25, 2014 11:44 PM2014-10-25T23:44:45+5:302014-10-25T23:48:50+5:30

निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा विजय झाला असला तरी मतांची टक्केवारीही २७़१६ अशी राहिली आहे़

The percentage of BJP in the Sleeping is 27 | निलंग्यात भाजपाची टक्केवारी २७़१६

निलंग्यात भाजपाची टक्केवारी २७़१६

googlenewsNext


निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा विजय झाला असला तरी मतांची टक्केवारीही २७़१६ अशी राहिली आहे़ त्यापाठोपाठ काँग्रेसची टक्केवारी असून, ती १७़४४ अशी आहे़ राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना यांची मतांची टक्केवारी ही अनुक्रमे ५़७१, ५़६६ आणि ४़०७ अशी आहे़
निलंगा मतदारसंघात यावेळी निवडणुकीसाठी १५ उमेदवार रिंगणात होते़ त्यात भाजपाचे संभाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर, राष्ट्रवादीचे बसवराज पाटील नागराळकर, मनसेचे अभय साळूंके, शिवसेनेतर्फे डॉ़ शोभा बेंजरगे यांच्यासह अन्य पक्षाचे व अपक्ष उमेदवार होते़ या निवडणुकीत भाजपाला ७६८१७, काँग्रेसला ४९३०६, राष्ट्रवादीला १६१४९, मनसेला १६०१५ आणि शिवसेनेला ११५२२ अशी मते मिळाली आहेत़ मतदारसंघात भाजपा आघाडीवर राहिला असून, शिवसेना ही पाचव्या स्थानावर राहिली आहे़ लिंबनप्पा रेशमे यांनी १७ हजार ६५० मते घेऊन मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत़ या मतदारसंघात सर्वात कमी मते राजेंद्र केसाळे यांना मिळाली असून, ती ३४३ अशी आहेत़
या मतदारसंघातील प्रमुख २० गावांपैैकी भाजपाला सर्वाधिक मते निलंगा शहरातून मिळाली असून, ती ५ हजार ६२८ अशी आहे़ त्यानंतर औराद शहाजानीतून मते मिळाली असून, २४३३ अशी संख्या आहे़ त्यापाठोपाठ देवणीतून मते मिळाली असून, ती १९०१ अशी आहेत़
काँग्रेसला सर्वाधिक मते निलंगा शहरातून मिळाली असून, ४ हजार ४९४ अशी संख्या आहे़ त्यापाठोपाठ औराद शहाजानीतून मतांची आघाडी मिळाली असून, २३१७ अशी संख्या आहे़ दापका येथून १०६८ मते मिळाली आहेत़ काँग्रेसला सर्वात कमी मते येरोळ येथून मिळाली आहेत़
राष्ट्रवादीला सर्वाधिक मते देवणी शहरातून मिळाली असून, ८४७ अशी संख्या आहे़ त्यापाठोपाठ निलंगा शहरातून मते मिळाली असून, ७६१ अशी संख्या आहे़ औराद शहाजानीतून ६५९ अशी मते मिळाली आहेत़ सर्वात कमी मते जाऊ गावातून मिळाली असून, केवळ ४ आहेत़
शिवसेनेला सर्वाधिक मते शिरूर अनंताळमधून मिळाली असून, २६७५ अशी संख्या आहे़ त्यापाठोपाठ साकोळमधून मते मिळाली असून, ३२० अशी संख्या आहे़ त्यापाठोपाठ औराद शहाजानीतून २१९ मते मिळाली आहेत़ जाऊ या गावातून एकही मत शिवसेनेला मिळू शकले नाही़
मनसेला सर्वाधिक मते पानचिंचोलीतून मिळाली असून, १३५८ अशी संख्या आहे़ त्यापाठोपाठ तगरखेड्यातून मते मिळाली असून, १११० अशी मतांची संख्या असून, अंबुलगा बु़ गावातून मनसेला ६८३ मते मिळाली आहेत़ सर्वात कमी मते जाऊ या गावातून मिळाली असून, ३० अशी संख्या आहे़
निलंगा शहराने भाजपला मताधिक्य दिले आहे़ ११३४ मतांची आघाडी भाजपला मिळाली आहे़ शहरातून दुसऱ्या स्थानावर काँग्रेस राहिला आहे़ तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी असून, चौथ्या स्थानावर मनसे आहे़ औराद शहाजानीतून भाजपाला मताधिक्य मिळाले असले तरी ते केवळ ११६ मतांचे आहे़ या गावातून राष्ट्रवादीला ५५९ मते मिळाली असून, चौथ्या स्थानावर मनसे तर पाचव्या स्थानावर शिवसेना राहिला आहे़
अंबुलगा बु़ गावाने भाजपाला मतांची आघाडी मिळवून दिली आहे़ या गावात काँग्रेसला ४३९ मते मिळाली असून त्याच्या तुलनेत मनसे आघाडीवर राहिला आहे़ तर शिवसेनेची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे़ राष्ट्रवादीला शतकही गाठता आले नाही़ वलांडी गावाने भाजपाला भरभरून साथ दिली आहे़ या गावात दुसऱ्या स्थानावर असलेल्या काँग्रेसला केवळ ४१२ मतावर समाधान मानावे लागले आहे़ राष्ट्रवादीला ३९२ मते मिळाली असून, तो तिसऱ्या स्थानावर राहिला आहे़ (वार्ताहर)४
या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवाराचे आपल्या गावावर कितपत प्रभुत्व आहे हे पहावयास मिळाले़ काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर यांचे मूळ गाव जाऊ असून, या गावातून त्यांना १९३ मते मिळाली आहेत़ ही मते सर्वाधिक आहेत़ या गावातून भाजपाला ५२, मनसे ३०, राष्ट्रवादीला ४ मते मिळाली आहेत़ शिवसेनेला आपले खातेही उघडता आले नाही़ भाजपाचे संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे मूळगाव औराद शहाजानी असून, तेथून त्यांना २४३३ मते मिळाली असली तरी काँग्रेसपेक्षा ११६ मतांची आघाडी मिळाली आहे़ इतर पक्षांनाही या गावातून बऱ्यापैकी मते मिळाली आहेत़

Web Title: The percentage of BJP in the Sleeping is 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.