घाटीचे ट्रामा केअर युनिट व्हेंटिलेटरवर थकबाकीचा परिणाम : ११ पैकी ८ व्हेंटिलेटर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:19 AM2018-01-16T00:19:28+5:302018-01-16T00:19:33+5:30

घाटी रुग्णालयातील ट्रामा इन्टेंसिव्ह केअर युनिट (टीआयसीयू) हा वॉर्डच सध्या व्हेंटिलेटरवर आहे. येथील ११ पैकी ८ व्हेंटिलेटर बंद आहेत. रुग्णालय प्रशासनाकडे थकबाकी असल्याने सदर कंपनी दुरुस्ती करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ तीन व्हेंटिलेटरच्या जोरावरच हे युनिट सुरूअसल्याने हा प्रकार रुग्णाच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Outcome of Outback of Valley Trauma Care Unit Ventilator: 8 out of 11 Ventilator Closed | घाटीचे ट्रामा केअर युनिट व्हेंटिलेटरवर थकबाकीचा परिणाम : ११ पैकी ८ व्हेंटिलेटर बंद

घाटीचे ट्रामा केअर युनिट व्हेंटिलेटरवर थकबाकीचा परिणाम : ११ पैकी ८ व्हेंटिलेटर बंद

googlenewsNext

संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील ट्रामा इन्टेंसिव्ह केअर युनिट (टीआयसीयू) हा वॉर्डच सध्या व्हेंटिलेटरवर आहे. येथील ११ पैकी ८ व्हेंटिलेटर बंद आहेत. रुग्णालय प्रशासनाकडे थकबाकी असल्याने सदर कंपनी दुरुस्ती करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ तीन व्हेंटिलेटरच्या जोरावरच हे युनिट सुरूअसल्याने हा प्रकार रुग्णाच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घाटी रुग्णालयातील यंत्रांना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. देखभाल दुरुस्तीसाठी वेळीच निधी मिळत नसल्याने अनेक यंत्रसामुग्री धूळखात पडली आहे. घाटी प्रशासनाकडून पाठपुरावा केला जातो; परंतु वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नसल्याने गोरगरीब रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. व्हेंटिलेटरलाही नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे. घाटी रुग्णालयात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या, मेंदूवरील विविध आजारांच्या उपचाराच्या दृष्टीने ट्रामा इन्टेंसिव्ह केअर युनिट उभारण्यात आले. या ठिकाणी ११ खाटा आहे. या खाटांनुसार या ठिकाणी ११ व्हेंटिलेटरची सुविधा देण्यात आली. घाटी रुग्णालयात दररोज येणाºया रुग्णांची विशेषत: अपघातग्रस्तांचे प्रमाण पाहता गंभीर जखमी असलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी हा विभाग महत्त्वपूर्ण ठरतो. उपचारामध्ये व्हेंटिलेटर महत्त्वाची भूमिका असते; परंतु आजघडीला या ठिकाणी केवळ ३ व्हेंटिलेटरच सुरूआहेत. अनेक दिवसांपासून ८ व्हेंटिलेटर बंद आहे. देखभाल-दुरुस्तीपोटी ८.६० लाख रुपये थकल्याने संबंधित कंपनीकडून दुरुस्ती टाळली जात असल्याचे समजते. व्हेंटिलेटरअभावी रुग्णाला गैरसोयीला सामोरे जाण्याची वेळ येत आहे; परंतु परिस्थितीकडे घाटी प्रशासनही गांभीर्याने पाहायला तयार नाही. शिवाय निधीच नसल्याने प्रशासन कंपनीपुढे हतबल होत असल्याचे दिसते.

Web Title: Outcome of Outback of Valley Trauma Care Unit Ventilator: 8 out of 11 Ventilator Closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.