प्रभागांचे आता रंगीत नकाशे करा

By Admin | Published: July 29, 2014 12:58 AM2014-07-29T00:58:21+5:302014-07-29T01:14:34+5:30

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल २०१५ मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार आहे. मनपाने केलेल्या ‘नकाशांचा’ आढावा राज्य निवडणूक आयोगाच्या दोन सदस्यांनी आज घेतला

Now make wings the colored maps | प्रभागांचे आता रंगीत नकाशे करा

प्रभागांचे आता रंगीत नकाशे करा

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिकेची एप्रिल २०१५ मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार आहे. मनपाने केलेल्या ‘नकाशांचा’ आढावा राज्य निवडणूक आयोगाच्या दोन सदस्यांनी आज घेतला. नकाशे कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) करण्यात आले आहेत. सर्व नकाशे कलर (रंगीत) करण्याचे आदेश सदस्यांनी पालिकेच्या निवडणूक विभागाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त अतुल जाधव आणि कानडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे नकाशांचा आढावा घेतला. मनपा उपायुक्त किशोर बोर्डे, उपअभियंता एस. पी. खन्ना यांची यावेळी उपस्थिती होती.
ब्लॅक अँड व्हाईट नकाशांमुळे दिशादर्शक खुणांमध्ये बदल होण्याचा संशय सदस्यांना आल्यामुळे कलर नकाशे करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. आयोगाने केलेल्या सूचनांमुळे मर्जीनुसार प्रभाग करून घेणाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाऊ शकते. कलर नकाशे होणार असल्यामुळे प्रभागांच्या सीमा (हद्द) ओळखण्यात कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट नकाशांवर कलर नकाशे करण्याचे काम पालिकेला हाती घ्यावे लागणार आहे.
नकाशाचे किती काम झाले, किती ठिकाणी अडचणी आहेत, त्याबाबत मनपाने काय भूमिका घ्यावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सदस्य आज पालिकेत आले होते.
सदस्यांनी प्रभाग पद्धती प्रकरणी मार्गदर्शन केले. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ११ लाख ७५ हजार ११६ इतकी आहे. १८ ते २२ हजार लोकसंख्या एका प्रभागासाठी निश्चित करण्यात आली आहे. ११४ प्रभाग होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला.
इच्छुकांच्या मनसुब्यांवर पाणी
जनगणनेसाठी प्रगणकांनी २ हजार लोकसंख्येचा एक ब्लॉक तयार केला आहे. त्या ब्लॉकआधारेच नकाशे असतील. रोटेशननुसार वाढीव लोकसंख्या पुढच्या वॉर्डात जोडली जाणार आहे. हे समीकरण काही इच्छुकांना समजले होते. त्यांनी दबावतंत्राचा वापर सुरू केला होता. मात्र, आता नकाशांमध्ये स्थळ सापडत नाही.
नकाशे ब्लॅक अँड व्हाईट करण्यात आले आहेत. ते कलर झाल्यास खुणा, दिशा सर्व काही स्पष्टपणे दिसतील. त्यामुळे हेराफेरीत जास्तीचा वाव राहणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
चार महिन्यांपासून काम
पालिकेच्या २० जणांची टीम विद्यमान नकाशांची हद्द कायम करण्यासाठी चार महिन्यांपासून परिश्रम घेत आहे.
नवीन नकाशे करण्याचा आदेश येणार असल्यामुळे आणखी दोन महिन्यांचा कालावधी त्यासाठी लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दोन महिने लागणार नकाशांना
२००५ मध्ये करण्यात आलेल्या वॉर्ड नकाशातील दिशादर्शक खूण (वॉर्ड हद्दीची खूण) २०१४ मध्ये सापडत नव्हती. त्यातच नकाशे ब्लॅक अँड व्हाईट करण्यात आले आहेत.
नकाशे रंगीत करावे लागणार असल्यामुळे मनपा निवडणूक विभागाचे काम आणखी वाढले आहे.
जुन्या प्रभाग रचनेतील नाले, रस्ते, धार्मिक स्थळे, झाडांच्या खुणा गायब झाल्यामुळे प्रभागांचे नकाशे तयार करण्यात अडचणी येत आहेत.

Web Title: Now make wings the colored maps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.