नाही चालली जातीय गणिते

By Admin | Published: May 18, 2014 12:37 AM2014-05-18T00:37:55+5:302014-05-18T00:39:27+5:30

परभणी : परभणी लोकसभा मतदार संघात नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख गुजरात पॅटर्नने मतदारांना आकर्षित केले़

Not running ethnic calculations | नाही चालली जातीय गणिते

नाही चालली जातीय गणिते

googlenewsNext

परभणी : परभणी लोकसभा मतदार संघात नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख गुजरात पॅटर्नने मतदारांना आकर्षित केले़ मोदींच्या या त्सुनामी लाटेसमोर विरोधकांचे पानीपत होऊन शिवसेनेने लागोपाठ चौथ्यांदा ही लोकसभा जिंकून आपला गड अभेद्य राखला़ शिवसेनेचे उमेदवार आ़ संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे यांचा सव्वा लाखांच्या फरकाने दणदणित पराभव करीत या मतदार संघातील जनता ही शिवसेनेच्या पाठीशी आहे हे दाखवून दिले़ परभणीचा अपवाद वगळता उर्वरित पाचही मतदार संघाने शिवसेनेला आघाडी दिली़ या निवडणुकीत आघाडीतर्फे विविध जातीय समीकरणे उघड उघड मांडीत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता़ विशेषत: मराठा मतांवर डोळा ठेवून राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मोहीम राबविली होती़ परंतु, मोदी लाटेपुढे हे नात्या-गोत्यांचे राजकारणही शिजले नाही़ विशेष म्हणजे मतदान यंत्रे उघडेपर्यंत मतदारांच्या मनाचा अंदाज आला नाही़ शिवसेनेला झालेल्या या भरघोस मतांमुळे परभणी जिल्ह्यातील विधानसभेचे राजकारणही बदलण्याची चिन्हे दिसत आहेत़ लोकसभा असो की विधानसभा निवडणूक़ या जिल्ह्यात शिवसेनेला कधी काँग्रेसची तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळते आणि त्यामुळे शिवसेनेचा फायदा होतो़ हे गणित मागच्या प्रमाणेच या निवडणुकीतही अनुभवास आले़ गेल्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीने शिवसेनेला विजयी केले होते़ यावेळी देखील हाच अनुभव आला़ जिंतूरचे काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, आ़ सीताराम घनदाट यांनी शिवसेनेचा बाण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चालविल्यामुळे मोदी लाटेला हवा मिळाली़ जातिय समिकरणांचा परिणाम परभणी लोकसभा मतदार संघात नेहमीच जातीय समीकरणे मांडली जातात़ कधी देशमुख-पाटील असा तर मराठ्यांमध्येच हलके-भारी असा भेदभाव करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न होतो़ आतापर्यंतच्या निवडणुकीत असे वाद होत असले तरी त्याची वाच्यता जगजाहीर होत नव्हती़ या निवडणुकीत मात्र या जातीय समीकरणाने अतिशय खालची पातळी गाठली होती़ विशेषत: शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हे उपरे म्हणून त्यांना नातेवाईक म्हणून मानण्याचीही तयारी नव्हती़ परंतु, शिवसेनेमध्ये जात-पात-धर्माला स्थान नाही हे या निवडणुकीतही मतदारांनी दाखवून दिले़ याउलट अल्पसंख्यांक मतदार हे एकजुटीने शिवसेनेकडे वळले़ नेत्यांनी बजावलेली भूमिका या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आ़ संजय जाधव यांना निवडून यावा यासाठी जेवढे प्रयत्न युतीच्या नेते मंडळींनी केले त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे हे कसे पराभूत होतील यासाठीही आघाडीच्या नेते मंडळींचा प्रयत्न झाला़ काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपूडकर, जि़प़चे उपाध्यक्ष समशेर वरपूडकर आणि त्यांच्या गटाने उघड उघड भांबळे यांच्या विरोधामध्ये प्रचार केला होता़ त्याचा फटकाही राष्ट्रवादीला बसला़ राज्यमंत्री फौजिया खान आणि माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, त्रिधाराचे चेअरमन तहसीन अहेमद खान यांनीही विरोधात काम केले म्हणून त्यांना पक्षाने नोटीसही बजावली़ नाही जाणवला अपक्ष आणि इतर पक्षांचा प्रभाव या लोकसभा निवडणुकीत १७ उमेदवार रिंगणात उतरले होते़ यात सहा अपक्षांचाही समावेश होता़ गेल्या निवडणुकीत अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांनी (शिवसेना आणि राष्ट्रवादी वगळून) १ लाख ७५ हजार मते घेतली होती़ त्या तुलनेत या निवडणुकीत उमेदवारांची संख्याही वाढली आणि मतदानही वाढले होते़ परंतु, त्यांनी घेतलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर यावेळी अपक्ष आणि इतर पक्षांनी (शिवसेना आणि राष्ट्रवादी वगळून) १ लाख २८ हजार २९ मते घेतली़ गेल्या वेळी बसपाला ६५ हजार मते मिळाली होती़ यावेळी बसपाला ३३ हजार ७१६ मतांवर समाधान मानावे लागले़ चौथ्या क्रमांकावर नोटाने १७ हजार ५०२ मते घेतली़ या मतदारांनी आपणास एकही उमेदवार पसंत नसल्याचे या अधिकारातून दाखवून दिले़ १७ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांना तर चार आकडी मतदानावरच समाधान मानावे लागले़ या १७ पैकी आंबेडकर नॅशनल काँग्रेसच्या अशोक अंभोरे यांना सर्वात कमी म्हणजे १८६९ मते मिळाली़ सहा अपक्षांपैकी सर्वात जास्त मते निसार सुभान खान पठाण यांनी १२ हजार ३४१ तर सर्वात कमी मते रामराव राठोड यांना ३ हजार १२० मते मिळाली़ इतरांची डाळ शिजली नाही या निवडणुकीत १७ उमेदवार आणि अनेक पक्ष रिंगणात उतरले होते़ परंतु, बसपा, भाकप आणि एका अपक्ष उमेदवाराने पाच अंकी संख्या गाठली़ बसपाच्या गुलमीर खान यांनी तिसर्‍या क्रमांकाची ३३ हजार ७१६ मते मिळविल्यामुळे घड्याळ बिघडले़

Web Title: Not running ethnic calculations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.