तीन तलाक कायद्याच्या विरोधात कन्नडमध्ये मुस्लीम महिलांचा मोर्चा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:47 PM2018-04-03T19:47:07+5:302018-04-03T19:49:43+5:30

मुस्लीम समाज विवाह अधिनियम २०१७ कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी मुस्लीम महिलांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. 

Muslim Women's rally in Kannada against three Divorce Act | तीन तलाक कायद्याच्या विरोधात कन्नडमध्ये मुस्लीम महिलांचा मोर्चा  

तीन तलाक कायद्याच्या विरोधात कन्नडमध्ये मुस्लीम महिलांचा मोर्चा  

googlenewsNext

कन्नड (औरंगाबाद ) : मुस्लीम समाज विवाह अधिनियम २०१७ कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी मुस्लीममहिलांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. 

ऊरूस मैदानावरून निघालेला मोर्चा करिमनगर,पिशोर नाका,अण्णाभाऊ साठे चौकमार्गे तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सर्वच महिला वक्त्यांनी मुस्लीम समाज विवाह अधिनियमाबाबत जोरदार टीका केली.  त्यानंतर मुस्लीम महिलांनी राष्ट्रपतींना तहसिल कार्यालयामार्फत निवेदन दिले. नायब तहसिलदार जोंधळे यांनी निवेदन स्वीकारले. 

अशा आहेत मागण्या 
हा कायदा केंद्र सरकारने लोकसभेत घाईघाईने पारित केले आहे. केंद्र सरकारने मुस्लीम समाजाचे अधिकृत ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड व समाजाचे उलेमा यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता हा अधिनियम पारीत केला आहे. कायद्याचा मसुदा तयार करतांना त्यात अनेक त्रुटी आहेत. यातून राजकीय हेतु साध्य करण्यासाठी सुप्रिम कोर्टाचा आधार घेऊन तीन तलाक कायदा करुन महिलांवर अन्याय करण्यात येत आहे. यामुळे हा कायदा रद्द करून शरीयत कायद्यात छेडछाड करू नये अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

Web Title: Muslim Women's rally in Kannada against three Divorce Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.