औरंगाबाद जिल्ह्यात टँकर भरण्यास आता हवे ‘एमआयडीसी’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 07:23 PM2019-04-20T19:23:51+5:302019-04-20T19:25:05+5:30

जिल्ह्यातील अनेक अधिग्रहित विहिरींनी गाठला तळ

MIDC's water needs to be filled in Aurangabad district water shortage | औरंगाबाद जिल्ह्यात टँकर भरण्यास आता हवे ‘एमआयडीसी’चे पाणी

औरंगाबाद जिल्ह्यात टँकर भरण्यास आता हवे ‘एमआयडीसी’चे पाणी

googlenewsNext

औरंगाबाद : यंदा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. प्रशासनाने अधिग्रहित केलेल्या अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी प्रकल्प कोरडेच आहेत. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत आहे. आजघडीला ९३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, उपलब्ध पाण्याचे स्रोत कमी पडत आहेत. त्यामुळे यापुढे टँकरची मदार ‘एमआयडीसी’च्या पाण्यावरच अवलंबून राहाणार आहे. 

एप्रिल महिन्यात जवळपास टँकरचा आकडा साडेनऊशेपर्यंत पोहोचला आहे. मे महिन्यात आणखी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाºयना विनंती करून नांदगाव तालुक्यातील गळमोडी प्रकल्प शंभर टक्के आरक्षित केला आहे. जिल्ह्यात तात्पुर्ती पूरक नळ योजना, विहिरींच्या खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत. त्याठिकाणी वैजापूर तालुक्यातील गावांसाठी लागणारे सुमारे १००-११० टँकर भरले जाणार आहेत. फारोळ जलशुद्धीकरण केंद्राने टँकर भरण्यासाठी शनिवार, दि. २० एप्रिलपर्यंतचीच मुदत दिलेली असून, महापालिकेकडून आणखी काही दिवस टँकर भरण्यासाठी विनंती केली जाणार आहे.

अधिग्रहित केलेल्या खाजगी विहिरींतून सध्या ४२८ टँकर भरले जातात. विहिरींमधील पाणी आटत चालल्यामुळे आगामी काळात तेथे भरण्यात येणाºया टँकरसाठी अन्य स्रोतांचा उपयोग करावा लागणार आहे. परिणामी, टँकर आणि पाण्याचे उद्भव यांच्यातील अंतर वाढल्यास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असून, ग्रामीण नागरिकांना वेळेवर पाणी मिळणार नाही. यासाठी तालुकानिहाय उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुढील टंचाईच्या  काळात ‘एमआयडीसी’चेच पाणी टँकरच्या माध्यमातून पुरवठा करावा लागणार आहे. 
नांदूर-मधमेश्वर कालव्यातून सोडल्या जाणाºया आवर्तनामुळे गंगापूर तालुक्यातील ५०-६० गावांचा पाणी प्रश्न तूर्तास मिटला आहे. यापुढे आणखी एक आवर्तन सोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पत्र दिले जाणार आहे. सिल्लोड तालुक्यात जांभई जलशुद्धीकरण केंद्र आणि केळगाव धरणातून टँकर भरले जातात. 

Web Title: MIDC's water needs to be filled in Aurangabad district water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.