डिप्लोमा करा किंवा घरी बसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:08 AM2017-09-22T01:08:38+5:302017-09-22T01:08:38+5:30

शासनाने शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी मार्च-२०१९ पर्यंत शिक्षणशास्त्राची पदविका किंवा पदवी प्राप्त करण्याची संधी दिली आहे. अप्रशिक्षित शिक्षकांनी यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी केले आहे. आतापर्यंत गरजेनुसार सक्षम प्राधिकाºयांनी शिक्षणशास्त्राची पदवी किंवा पदविका नसतानादेखील अनेक शिक्षकांना वैयक्

Learn diploma or seat at home | डिप्लोमा करा किंवा घरी बसा

डिप्लोमा करा किंवा घरी बसा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सुमारे ८०० ते ९०० अप्रशिक्षित शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहेत. शिक्षण हक्क कायद्यान्वये शिक्षणशास्त्राची पदविका किंवा पदवीधारकांनाच शाळांमध्ये अध्यापनाचे काम करता येते. त्यानुसार शासनाने शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी मार्च-२०१९ पर्यंत शिक्षणशास्त्राची पदविका किंवा पदवी प्राप्त करण्याची संधी दिली आहे. अप्रशिक्षित शिक्षकांनी यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी केले आहे.
आतापर्यंत गरजेनुसार सक्षम प्राधिकाºयांनी शिक्षणशास्त्राची पदवी किंवा पदविका नसतानादेखील अनेक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता दिलेली होती. आता अशा अप्रशिक्षित शिक्षकांना कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च २0१९ पूर्वी शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका प्राप्त करणे बंधनकारक आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या पोर्टलवर ३० सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्च २0१९ पूर्वी अप्रशिक्षित शिक्षक हे प्रशिक्षित होऊ शकले नाहीत, तर त्यांची सेवा समाप्त होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
साधारण पंधरा ते वीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागामध्ये अथवा अन्य दुर्गम ठिकाणी शिक्षक मिळणे कठीण होते. त्यामुळे शिक्षण विभागाने तेव्हा शिक्षणशास्त्राची पदवी किंवा पदविकाची अट न पाहता अप्रशिक्षित शिक्षकांना सेवेत सामावून घेतले होते. राज्यात आजही इयत्ता १० ते पदवी उत्तीर्ण शिक्षक सेवेत कार्यरत
आहेत.
यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळांमध्ये अशा अप्रशिक्षित शिक्षकांचा भरणा अधिक आहे. अनेक खाजगी विनाअनुदानित सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षकांच्या नोंदणी सरल प्रणालीतील ‘युडायस’वर आहेत. काहींच्या ‘युडायस’वर नोंदी नाहीत, अशा सर्व सक्षम प्राधिकाºयांकडून वैयक्तिक मान्यता मिळालेल्या अप्रशिक्षित शिक्षकांना ३१ मार्चपर्यंत शिक्षणशास्त्राची पदवी किंवा पदविका पूर्ण करावी लागणार
आहे.

Web Title: Learn diploma or seat at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.