औरंगाबादचे जोशी राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:53 AM2019-02-05T00:53:15+5:302019-02-05T00:53:28+5:30

औरंगाबादचे क्रीडा संघटक श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचे जय कवळी हे अध्यक्षपदी असणार आहेत. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची सर्वसाधारण सभा ठाणे येथे नुकतीच पार पडली.

Joshi of the State Boxing Association of Aurangabad | औरंगाबादचे जोशी राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी

औरंगाबादचे जोशी राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबादचे क्रीडा संघटक श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. मुंबईचे जय कवळी हे अध्यक्षपदी असणार आहेत.
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेची सर्वसाधारण सभा ठाणे येथे नुकतीच पार पडली. या बैठकीत २0१८ ते २0२२ या कालावधीसाठी निवडणूक अधिकारी अ‍ॅड. बी. जी. आगवणे यांनी कार्यकारिणी जाहीर केली. या निवडणुकीला भारतीय बॉक्सिंग महासंघाचे निरीक्षक राजेश देसाई व महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे महेश लोहार उपस्थित होते.
औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष असणारे माजी आ. श्रीकांत जोशी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने राज्य संघटनेत मराठवाड्याला प्रतिनिधित्व मिळाले आहे. श्रीकांत जोशी यांच्यासह आॅलिम्पियन मनोज पिंगळे, शाहू बिराजदार, गोपाळ देवांग, गुरुप्रसाद रेगे, सतेज पाटील, रमेश बागवे, राहुल पाटील यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली. महासचिवपदी चंद्रपूर येथील राकेश तिवारी व खजिनदारपदी एकनाथ चव्हाण यांचीही निवड झाली आहे. श्रीकांत जोशी यांच्या निवडीबद्दल औरंगाबाद बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष एकनाथ जाधव, केजल भट्ट, सचिव पंकज भारसाखळे, कोषाध्यक्ष आरोह बर्वे, सतीश भट्ट, प्रदीप खांड्रे, नीरज भारसाखळे, राहुल टाक, अनिल मिरकर, अजय जाधव व रवींद्र माळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Joshi of the State Boxing Association of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.