ठेकेदारावर एकाचा लोखंडी टॉमीने हल्ला

By Admin | Published: July 28, 2014 12:44 AM2014-07-28T00:44:07+5:302014-07-28T01:04:15+5:30

वाळूज महानगर : घर खरेदी-विक्रीच्या कारणावरून ठेकेदार लोखंडी टॉमीने झालेल्या हल्ल्यात जखमी झाला. हा प्रकार २६ जुलैच्या सायंकाळी घडला.

An Iron Tommy attack on the contractor | ठेकेदारावर एकाचा लोखंडी टॉमीने हल्ला

ठेकेदारावर एकाचा लोखंडी टॉमीने हल्ला

googlenewsNext

वाळूज महानगर : घर खरेदी-विक्रीच्या कारणावरून ठेकेदार लोखंडी टॉमीने झालेल्या हल्ल्यात जखमी झाला. हा प्रकार २६ जुलैच्या सायंकाळी घडला. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजापूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा ठेकेदार शेख इस्माईल शेख इब्राहीम यांनी काही दिवसांपूर्वी गावातील शेख मुसा शेख रसूल यांच्याकडून घर खरेदी केले होते. नवे घर मिळेपर्यंत या घरात राहण्याची परवानगी शेख मुसा याने शेख इस्माईल यांच्याकडून घेतली होती. शेख मुसा हा घर रिकामे करीत नसल्यामुळे शेख इस्माईल याने गावातील प्रतिष्ठित नागरिक व मध्यस्थांच्या मदतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही शेख मुसा घराचा ताबा देण्याचे टाळत होता. त्यानंतर शेख इस्माईल याने या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन न्यायालयातही धाव घेतली होती.
या प्रकारामुळे संतापलेल्या शेख मुसा व त्याचे साथीदार शेख मुन्सी मुसा, शेख इसाक मुसा व नबीनशहा शेख रसूल यांनी २६ जुलै रोजी साजापुरात सायंकाळी ६ च्या सुमारास शेख इस्माईल व त्यांच्या नातेवाईकांनी शेख सलीम शेख मुसा यांच्याशी वाद घातला. ‘माझ्याविरुद्ध कोर्टात केस का केली व माझे घर तुम्ही कसे घेता?’ असे म्हणून शेख मुसा याने ठेकेदार शेख इस्माईल यांच्या डोक्यावर लोखंडी टॉमीने वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. आरोपींनी ठेकेदाराला लोखंडी पाईपने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाण होत असताना शेख सलीम याने मध्यस्थी केली असता त्यालाही या आरोपींनी बेदम मारहाण केली.
परस्परविरोधी तक्रारी
या हल्लाप्रकरणी आरोपी शेख मुसा, शेख मुन्सी मुसा, शेख इसाक मुसा व नबीनशहा शेख रसूल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी शेख मुसा रसूल यानेही घर रिकामे करण्यावरून शेख इस्माईल, शेख कलीम मुसा, शेख मकसूद, शेख कैसर यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटाच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, तपास फौजदार अजयकुमार पांडे करीत आहेत.

Web Title: An Iron Tommy attack on the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.