अर्जांच्या छाननीत दिग्गजांची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:27 AM2017-09-26T00:27:04+5:302017-09-26T00:27:04+5:30

महापालिका निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत दिग्गजांची धाकधूक रात्री उशिरापर्यंत कायम होती. उमेदवारी अर्जाची संख्या आणि आॅनलाईन प्रणालीचा घोळ यामुळे रात्री उशिरापर्यंत नेमके किती अर्ज वैध ठरले आणि किती अवैध ठरले, याची माहिती निवडणूक विभाग देऊ शकला नव्हता. रात्री १० वाजेपर्यंत ११५२ पैकी ९०१ अर्ज वैध तर ८२ अर्ज अवैध ठरले असल्याचे सांगण्यात आले़

Intimidation of applications by scrutinizing applications | अर्जांच्या छाननीत दिग्गजांची धाकधूक

अर्जांच्या छाननीत दिग्गजांची धाकधूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: महापालिका निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत दिग्गजांची धाकधूक रात्री उशिरापर्यंत कायम होती. उमेदवारी अर्जाची संख्या आणि आॅनलाईन प्रणालीचा घोळ यामुळे रात्री उशिरापर्यंत नेमके किती अर्ज वैध ठरले आणि किती अवैध ठरले, याची माहिती निवडणूक विभाग देऊ शकला नव्हता. रात्री १० वाजेपर्यंत ११५२ पैकी ९०१ अर्ज वैध तर ८२ अर्ज अवैध ठरले असल्याचे सांगण्यात आले़
महापालिका निवडणुकीत २० प्रभागातील ८१ वॉर्डासाठी २३ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. अंतिम मुदतीपर्यंत ११५२ अर्ज प्राप्त झाले होते. या अर्जांची मनपा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात छाननी सुरु होती. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. १ मध्ये तरोडा खुर्द, तरोडा बु.,सांगवी, हनुमानगड या चार प्रभागातील उमेदवारांची छाननी सुरु होती. येथे २२४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १९६ अर्ज वैध ठरले तर २४ अर्ज अवैध ठरले. निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. २ येथे भाग्यनगर, गणेशनगर, श्रावस्तीनगर या तीन प्रभागातील १४८ उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, त्यात १२६ अर्ज वैध तर १२ अर्ज अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्र. ३ येथे प्रभाग ८ ते १० मधील शिवाजीनगर, नवा मोंढा आणि दत्तनगर प्रभागातील छाननी करण्यात आली. प्राप्त झालेल्या २०२ अर्जापैकी छाननीअंती १८ अर्ज अवैध ठरले आणि १८४ अर्ज वैध ठरले आहेत. निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. ४ येथे १६७ पैकी ७९ अर्ज वैध ठरले तर अवैध ठरलेल्या अर्जाची संख्या मात्र समजू शकली नाही.
निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. ५ येथे १९४ पैकी १४९ अर्ज वैध ठरले तर १४ अर्ज अवैध ठरले आहेत़ निवडणूक अधिकारी कार्यालय क्र.६ मधये ११९ पैकी ८७ अर्ज वैध ठरले तर ३२ अर्ज अवैध ठरले आणि निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. ७ येथे ९८ पैकी ७० अर्ज वैध ठरले आणि ७ अर्ज अवैध ठरल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, या छाननीमध्ये अनेक दिग्गजांचे अर्ज अवैध ठरल्याची चर्चा सुरु होती. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मात्र कोणताही अधिकृत निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले. निवडणूक अधिकारी कार्यालय क्र. ७ येथे प्रभाग १९ व २० मधील उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये राष्टÑवादीच्या जयश्री जिंदम, सरस्वती हनवते, सपना सूर्यवंशी यांच्या शपथपत्रावर स्वाक्षºया नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. या आक्षेपानंतर हे अर्ज त्रुटी दाखवत बाद करण्यात आले.
प्रभाग २० मध्येच राष्टÑवादीचे बजरंग भेंडेकर यांचीही शपथपत्रावर स्वाक्षरी नसल्याची बाब पुढे आली. तो अर्जही बाद करण्यात आला. त्याचवेळी जयश्री टेळकीकर, आसेफ खान, देवानंद सरोदे यांच्या अर्जातही त्रुटी आढळून आल्याने ते बाद करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

Web Title: Intimidation of applications by scrutinizing applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.