‘त्या’ तलाठ्याची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 08:18 PM2018-12-03T20:18:24+5:302018-12-03T20:19:39+5:30

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकऱ्याची जमीन तलाठ्याने दुस-याच्या नावावर केली म्हणून शेतकºयाने आत्महत्या केल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रसिद्ध करताच उपविभागीय अधिका-यांनी चौकशी सुरूकेली आहे.

 The 'inquisition' inquiry started | ‘त्या’ तलाठ्याची चौकशी सुरू

‘त्या’ तलाठ्याची चौकशी सुरू

googlenewsNext

फुलंब्री (जि. औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील कृष्णापूरवाडी येथील शेतकऱ्याची जमीन तलाठ्याने दुस-याच्या नावावर केली म्हणून शेतकºयाने आत्महत्या केल्याचे वृत्त लोकमतने सोमवारी प्रसिद्ध करताच उपविभागीय अधिका-यांनी चौकशी सुरूकेली आहे.
आपली दोन एकर ३ आर जमीन दुसºयाच्या नावावर झाल्याचे कळताच कृष्णापूरवाडी येथील शेतकरी भावसिंग सुंदर्डे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी निहालसिंग वाळुबा सुंदर्डे, खुशालसिंग वाळुबा सुंदर्डे, महासिंग वाळुबा सुंदर्डे, परमजितसिंग कर्तारसिंग धिल्लो या चार जणांविरुद्ध फुलंब्री पोलिसांनी गुन्हा दाखल करून यातील निहालसिंग सुंदर्डे याला अटक केली. इतर तीन आरोपी फरार आहेत. या घटनेला तलाठी पुंजाबा बिरारे हे जबाबदार असल्याचा आरोप मयत शेतक-याचा मुलगा धरमसिंग सुंदर्डे यांनी केल्याने उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांनी सोमवारी तलाठी बिरारे यांना बोलावून खुलासा मागून त्यांची चौकशी सुरूकेली आहे.

Web Title:  The 'inquisition' inquiry started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.