मराठवाड्याच्या मल्लाकडून आता आॅलिम्पिक पदकाच्या आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 01:32 AM2018-04-13T01:32:42+5:302018-04-13T01:33:31+5:30

राष्ट्रीय स्पर्धेतील सोनेरी कामगिरी केल्यानंतर आॅलिम्पिकसाठी डावलले गेल्यानंतरही हार न मानता मराठवाड्याचा जिगरबाज पहिलवान राहुल आवारे याने आज राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या गटात आपणच सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करताना भारताला सोनेरी यश मिळवून दिले. त्याच्या कामगिरीने पूर्ण महाराष्ट्रातच दिवाळी साजरी करण्यात आली. अतिशय खडतर परिश्रम, अनेक अडथळ्यांवर जिद्दीने व चिकाटीने मात करणाऱ्या या भीमपराक्रमी राहुल आवारे आता २0२0 साली टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी सोनेरी कामगिरी करील, असा विश्वास महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

Hope of Olympic medal from Marathwada Malla now | मराठवाड्याच्या मल्लाकडून आता आॅलिम्पिक पदकाच्या आशा

मराठवाड्याच्या मल्लाकडून आता आॅलिम्पिक पदकाच्या आशा

googlenewsNext

औरंगाबाद : राष्ट्रीय स्पर्धेतील सोनेरी कामगिरी केल्यानंतर आॅलिम्पिकसाठी डावलले गेल्यानंतरही हार न मानता मराठवाड्याचा जिगरबाज पहिलवान राहुल आवारे याने आज राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या गटात आपणच सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करताना भारताला सोनेरी यश मिळवून दिले. त्याच्या कामगिरीने पूर्ण महाराष्ट्रातच दिवाळी साजरी करण्यात आली. अतिशय खडतर परिश्रम, अनेक अडथळ्यांवर जिद्दीने व चिकाटीने मात करणाऱ्या या भीमपराक्रमी राहुल आवारे आता २0२0 साली टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी सोनेरी कामगिरी करील, असा विश्वास महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
गुरुदक्षिणा मिळाली : काका पवार
राष्ट्रकुल स्पर्धेत राहुल आवारे एक नंबर खेळला. १९८२ नंतर भारताला सुवर्णपदक जिंकून देणारा तो महाराष्ट्राचा पहिला मल्ल ठरला. राहुल आवारेने सुवर्णपदक जिंकून देशाचे, महाराष्ट्राचे, मराठवाड्याचे आणि आमच्या तालमीचेही नाव उंचावले. तथापि, आता अर्धे स्वप्न पूर्ण झाले आहे. आॅलिम्पिकमध्ये सोनेरी कामगिरी करून तो नक्कीच माझे आणि गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांचे स्वप्न साकार करणार हे निश्चित. त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्याला व बिराजदार मामा यांना गुरुदक्षिणा दिल्याचे मत अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांनी व्यक्त केली आहे.
राहुलच्या यशात काका पवार यांचे योगदान : बाळासाहेब लांडगे
राहुल आवारे याने राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्ती खेळात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याच्या आताच्या व आधीच्या कामगिरीतही प्रशिक्षक काका पवार यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यावर याआधी खूप अन्याय झाला आहे. तो एक आक्रमक खेळणारा पहिलवान आहे. २0२0 साली टोकियोत होणाºया आॅलिम्पिकस्पर्धेसाठी तो पात्र ठरेल, अशी आशा आहे, असे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी सांगितले.
अभिमानाची बाब
राहुलने जी सुवर्ण कामगिरी केली आहे ती सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. गुणवत्ता असूनही त्याच्यावर अनेकदा अन्याय झाला. त्यानंतरही खचून न जाता इतके वर्षे प्रचंड मेहनत करून स्पर्धेत तो टिकला, ही फार मोठी बाब आहे. राजकारणामुळे झालेल्या अन्यायानंतरही त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकून स्वत:ला सिद्ध केले, असे विभागीय सरचिटणीस प्राचार्य दयानंद भक्त यांनी सांगितले.
खडतर मार्गानंतर यश
आपले बंधू राहुल आवारे यांचा आतापर्यंतचा प्रवास खूप खडतर झाला आहे. त्यातून त्याने सावरताना भारतात ५७ किलो वजन गटात आपणच सर्वोत्तम आहोत हे सिद्ध करून दिले. त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने पूर्ण महाराष्ट्रातच दिवाळी साजरी झाली. ग्रामीण भागातून येथपर्यंत यशस्वीपणे मार्गक्रमण करता येते हा आदर्श त्याने युवा पिढीला घालून दिला आहे. वडील बाळासाहेब आणि आई शारदा, गुरू हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार यांनी त्याला दिशा दिली. त्याचे २०२० टोकियो आॅलिम्पिकचेही लक्ष्य पूर्ण होईल याचा विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया राहुलचा बंधू गोकुळ आवारे याने व्यक्त केली.
मराठवाड्याच्या कुस्तीला नवसंजीवनी
राहुल आवारे याच्या सोनेरी यशामुळे मराठवाड्याच्या कुस्तीला नवसंजीवनी मिळाली आहे. दंगल या चित्रपटामुळे मुलींचा कल कुस्तीकडे वाढला होता. आता राहुलच्या यशामुळे युवा पिढीदेखील कुस्तीकडे वळेल आणि मुलांचा सहभाग वाढेल, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक नितीश काबलिये याने व्यक्त केली.
जास्त ट्रेनिंग घ्यावी
राहुलने या यशामुळे येथेच न थांबता आॅलिम्पिकसाठी तयारी करावी. सत्कार समारंभात जास्त गुंतू नये आणि आॅलिम्पिकमधील त्याचा वजन गट निश्चित करावा. या स्पर्धेत त्याने जी जिद्द व चिकाटी दाखविली ती कायम ठेवून आॅलिम्पिक पात्रता फेरीत यश मिळावे व नंतर आॅलिम्पिकमध्ये मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे प्रशिक्षक शरद कचरे यांनी सांगितले.
अभिमानास्पद कामगिरी
राहुलची कामगिरी ही अभिमानास्पद आहे. त्याने देशाचे नाव उंचावले आहे. सुशीलकुमारने जशे नाव कमावले, तसे राहुल आवारे याने आॅलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत पदक जिंकून नाव कमवावे. त्याने खाशाबा जाधवनंतर महाराष्ट्राला आॅलिम्पिकपदक जिंकून द्यावे, अशी प्रतिक्रिया शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पर्वत कासुरे यांनी व्यक्त केली आहे.

राहुलला पाठबळ देण्याची गरज
राहुलने मराठवाड्याचे नाव राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत उंचावले आहे. बºयाच वर्षांनंतर मराठवाड्याच्या मल्लाला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकता आले. राहुलवर आॅलिम्पिकमध्ये निवड न करून दुसºयाला ऐनवेळेस पाठवून अन्याय झाला होता. आता त्याला आर्थिकदृष्ट्या सरकार व कुस्तीगीर परिषदेचे पाठबळ मिळाल्यास तो आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करील, असे माजी राष्ट्रीय मल्ल फुलचंद सलामपुरे यांनी सांगितले.
इतरांसमोर आदर्श ठेवला
सुरुवातीच्या काळात राहुलला खूप संघर्ष करावा लागला. त्याच्या घरची परिस्थिती खूप प्रतिकूल होती. त्याने कठोर परिश्रम घेऊन गरिबीवर मात करीत उत्कृष्ट पहिलवान बनून इतरांसमोर आदर्श ठेवला. २00७-८ मध्ये त्याने आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते व त्यावेळेस आपण प्रशिक्षक होतो, असे प्रशिक्षक हंसराज डोंगरे यांनी सांगितले.
अखंड तपश्चर्येचे फळ
खूप संघर्ष व दुखापतींवर मात करीत राहुलने हे अतुलनीय यश मिळवले आहे. त्याच्या अखंड तपश्चर्येचे फळ म्हणजे राष्ट्रकुलमध्ये जिंकलेले सुवर्णपदक आहे. तो नक्कीच २0२0 साली टोकियोत होणाºया आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करील, असे मत कुस्ती प्रशिक्षक मंगेश डोंगरे यांनी व्यक्त केले.
देदीप्यमान यश
राहुलने मिळवलेले हे यश देदीप्यमान आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने हे यश मिळवले आहे. आता त्याने वेळ वाया जाऊ न देता २0२0 साली टोकियो आॅलिम्पिकची तयारी करून देशासाठी पदक जिंकावे, असे मत कुस्तीप्रेमी विनायक पांडे यांनी नोंदवले.

Web Title: Hope of Olympic medal from Marathwada Malla now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.