गुरूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकायचे गोल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:10 AM2018-01-01T00:10:28+5:302018-01-01T00:10:52+5:30

माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांचे मी आॅलिम्पिक खेळावे हे स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच आहे. माझ्या गुरूंसाठी आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे १२ ते १४ एप्रिलदरम्यान होणाºया राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे. महाराष्ट्राच्या मातीसाठी मी जीवात जीव असेपर्यंत खेळणार असल्याचे उद्गार महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय पहिलवान राहुल आवारे याने ‘लोकमत’शी बोलताना काढले.

 Goldman to win Commonwealth Games | गुरूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकायचे गोल्ड

गुरूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकायचे गोल्ड

googlenewsNext
ठळक मुद्दे राहुल आवारे : महाराष्ट्राच्या मातीसाठी जीव असेपर्यंत खेळणार

जयंत कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांचे मी आॅलिम्पिक खेळावे हे स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच आहे. माझ्या गुरूंसाठी आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे १२ ते १४ एप्रिलदरम्यान होणाºया राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे. महाराष्ट्राच्या मातीसाठी मी जीवात जीव असेपर्यंत खेळणार असल्याचे उद्गार महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय पहिलवान राहुल आवारे याने ‘लोकमत’शी बोलताना काढले.
२००८ साली पुणे येथे युथ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि तुर्की येथील ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाºया बीड जिल्ह्यातील राहुल आवारे याने २०१० ते २०१७ दरम्यान राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग सुवर्णपदक जिंकले आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याने इंदौरला राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेल्या सुवर्णपदकाचा समावेश आहे. तसेच त्याने एकूण २७ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत १७ पदकांची लूट केली आहे. डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. सोनिपत येथे आॅस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेसाठी नुकत्याच सिलेक्शन ट्रायल्स झाल्या. त्यात कठीण ड्रॉ असतानाही चित्त्याची चपळाई आणि तीक्ष्ण नजर असणाºया राहुल आवारे याने रिओ आॅलिम्पिकमध्ये खेळणाºय संदीप तोमर याचा १५-९, अमित कुमार दहिया याचा ६-५ आणि दिल्लीच्या रविकुमार याला १०-० अशी धूळ चारत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले. या यशानंतर राहुल आवारे याने ‘लोकमत’शी संवाद साधला.
तो म्हणाला, ‘आपले गुरू ध्यानचंद पुरस्कारप्राप्त हरिश्चंद्र बिराजदार आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांचे आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. टप्प्याटप्प्याने मला मार्गक्रमण करायचे आहे. आता माझ्या गुरूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे. या स्पर्धेसाठी आपली तयारी जोरात सुरू आहे. दररोज तीन-तीन तासांच्या दोन सत्रांत कसून सराव आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी परदेशातही प्रशिक्षणासाठी जाणार आहोत. तेथे आधुनिक आणि नवीन नियमानुसार सरावावर आपला भर असणार आहे.’
विशेष म्हणजे २०१० आणि २०१४ साली राहुल आवारे याच्यावर अन्याय झाला होता. त्यावेळी भारतीय संघात मुख्य दावेदार असतानाही त्याची निवड झाली नव्हती. या कडू आठवणी त्याच्या आजही स्मरणात आहेत. त्यामुळे त्याच्यात पदक जिंकण्याची जिद्द अजून वाढली आहे.
प्रो रेसलिंगचाही फायदा होत असल्याचे राहुल सांगतो. तो म्हणाला, गत वेळेस मी मुंबई संघाकडून होतो. यावेळी मी यूपी दंगल संघाकडून खेळणार आहे. या संघात बजरंग पुनिया, गीता फोगट, विनेश फोगट व इराणचा मल्ल आहे. प्रो रेसलिंग ही मल्लांसाठी खूपच लाभदायी आहे. या स्पर्धेत तुम्हाला आॅलिम्पिक चॅम्पियन, जागतिक पातळीवरील पदक विजेते, अशा परदेशातील मल्लांविरुद्ध खेळण्याची संधी मिळते. हा अनुभव महत्त्वाचा ठरत आहे. त्याचप्रमाणे मल्लांना आर्थिक स्रोतही निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचा खुराकाचा प्रश्न सुटला, असे त्याने सांगितले.
काका पवार यांच्यामुळे पुढचा मार्ग सुकर झाला
राहुल आवारे हा त्याचे गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांच्या निधनानंतर खचला होता. त्यातच २०१२ मध्ये त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती; परंतु गुरू काका पवार यांनी राहुल आवारे याच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागृत केला. याविषयी राहुल म्हणाला, ‘त्या वेळेस २०१२ आणि २०१३ मध्ये खेळलो नव्हतो. पायावरील शस्त्रक्रियेनंतर काका पवार यांनीच माझ्याकडून कोलकाता येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तयारी करून घेतली. त्यांच्यामुळेच माझा पुढचा मार्ग सुकर झाला.’
राहुलकडून संपूर्ण महाराष्ट्रालाच आशा - काका पवार
२०१० व २०१४ मध्ये राहुल आवारे याच्यावर अन्याय झाला. त्यामुळे त्याला त्यावर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत खेळता आले नाही; परंतु अखेर देवाने त्याला त्याच्या कष्टाचे फळ दिले. त्याला आपण २०२४ पर्यंत खेळायचे आणि देशाला पदक जिंकून द्यायचे असे सांगितले आहे. सर्व महाराष्ट्राच्या त्याच्यावर आशा आहेत. त्याच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्र उभा आहे, असे राहुलचे प्रशिक्षक काका पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल आवारे याच्यासह किरण भगत, उत्कर्ष काळे आणि अभिजित कटके यांना दत्तक घेतले. या सर्वांचा खुराक, प्रशिक्षणाचा खर्च आपण करू, असा शब्द शरद पवार यांनी आपल्याला दिला असल्याचे काका यांनी सांगितले.

Web Title:  Goldman to win Commonwealth Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.