सामान्य रुग्णालय बंदच कोर्टाची डेडलाइन हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:12 AM2017-12-01T01:12:57+5:302017-12-01T01:13:01+5:30

चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ३० नोव्हेंबरपूर्वी कार्यान्वित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. परंतु न्यायालयाने दिलेली ही डेडलाइनही हुकली असून, रुग्णालयात केवळ कार्यालयीन कामकाज सुरू आहे. याठिकाणी अद्यापही रुग्णसेवा सुरू होऊ शकली नाही.

 The general hospital closure court deadline took place | सामान्य रुग्णालय बंदच कोर्टाची डेडलाइन हुकली

सामान्य रुग्णालय बंदच कोर्टाची डेडलाइन हुकली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय ३० नोव्हेंबरपूर्वी कार्यान्वित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. परंतु न्यायालयाने दिलेली ही डेडलाइनही हुकली असून, रुग्णालयात केवळ कार्यालयीन कामकाज सुरू आहे. याठिकाणी अद्यापही रुग्णसेवा सुरू होऊ शकली नाही.
गेल्या काही वर्षांपासून नुसती प्रतीक्षेत असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय ३० नोव्हेंबरपूर्वी कार्यान्वित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. सार्वजनिक विभागाने ३ आॅक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालयाच्या इमारतीचा ताबा घेतला. या रुग्णालयासाठी २७८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. याठिकाणी एक्स-रे मशीन दाखल झाली आहे. परंतु अन्य यंत्रसामग्री येणे बाकी आहे. यंत्रसामग्रीच्या प्रतीक्षेत रुग्णालय सुरू होणे आणखी लांबणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रुग्णालयाच्या भव्य अशा इमारतीमध्ये खाटांपासून टेबल, खुर्च्यांपर्यंत अनेक जुने साहित्य दाखल झाले आहे. याठिकाणी नियोजित विभागांमध्ये कर्मचारीही कार्यरत झालेले आहेत; परंतु रुग्णसेवेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. रुग्णसेवा कधी सुरू होणार, याचे उत्तर अद्यापही कोणाकडेच नाही.
याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड म्हणाले, रुग्णालयास यंत्रसामग्री प्राप्त होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करू शकलो नाही. यासंदर्भात न्यायालयास माहिती दिली जाईल.

Web Title:  The general hospital closure court deadline took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.