दोन वकिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

By Admin | Published: January 6, 2017 04:29 PM2017-01-06T16:29:57+5:302017-01-06T16:29:57+5:30

जुन्या वैयक्तीक वादातून दोन वकिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

Free style shootout in two lawyers | दोन वकिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

दोन वकिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.६ - जुन्या वैयक्तीक वादातून दोन वकिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत जखमी झालेल्या तीन जणांना घाटीत दाखल करण्यात आले. ही घटना जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील वकिलांच्या कक्षात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
अ‍ॅड.मनोहर रामदास लोखंडे (४५,रा. कोेकणवाडी) आणि त्यांची पत्नी कविता मनोहर लोखंडे(३०) तसेच अ‍ॅड. रघूनंदन जाधव अशी जखमींची नावे आहेत. प्राप्त माहिती अशी की, अ‍ॅड. मनोहर आणि अ‍ॅड. लोखंडे हे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील वकिलांच्या कक्ष क्रमांक १ मध्ये शेजारीच बसतात. दोघांचे टेबल शेजारीच असल्याने त्यांच्यात वैयक्तिक कारणावरुन आपसात वाद आहे. अ‍ॅड. मनोहर यांची कविता ही दुसरी पत्नी असून ती त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत न्यायालयात येत असते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारी  अ‍ॅड. मनोहर लोखंडे आणि त्यांची पत्नी न्यायालयात गेले. वकिलांच्या कक्षातील त्यांच्या खुर्चीवर ते बसले आणि त्यांच्याशेजारील अ‍ॅड.जाधव यांची खुर्ची त्यांनी ओढली आणि त्या खुर्चीवर त्यांनी त्यांच्या पत्नीला बसविले. काहीवेळानंतर अ‍ॅड. जाधव तेथे गेले तेव्हा त्यांना त्यांची खुर्ची अ‍ॅड. लोखंडे यांच्याकडे असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी माझी खुर्ची का घेतली असा जाब विचारला.यावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यानंतर या भांडणांचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी मध्यस्थी करणाºया लोखंडे यांच्या पत्नीलाही जाधव यांनी मारहाण केली.  यावेळी उपस्थित वकिलांनी हे भांडण सोडविले तसेच तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनीही जखमींना  घाटीत दाखल करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.जाधव यांनी लोखंडी चेनने या आपल्याला मारल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तर लोखंडे यांनीही अ‍ॅड. जाधव यांना मारल्याने तेही यात जखमी झाले. 

Web Title: Free style shootout in two lawyers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.