वाळूने भरलेल्या हायवामागे मालकाची चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 11:28 PM2019-06-30T23:28:08+5:302019-06-30T23:28:24+5:30

जालना आणि बीडमधील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणाने विधिमंडळाला धडक दिलेली असतानाच औरंगाबादमध्ये वाळू माफियाचा पाठलाग करताना अप्पर तहसीलदारांच्या पथकासोबत भयावह थरार घडला.

 The four-wheeler is full of sand-filled highways | वाळूने भरलेल्या हायवामागे मालकाची चारचाकी

वाळूने भरलेल्या हायवामागे मालकाची चारचाकी

googlenewsNext

औरंगाबाद : जालना आणि बीडमधील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणाने विधिमंडळाला धडक दिलेली असतानाच औरंगाबादमध्ये वाळू माफियाचा पाठलाग करताना अप्पर तहसीलदारांच्या पथकासोबत भयावह थरार घडला.

महसूल पथकाने मोठ्या शिताफीने वाळूचोरांना ताब्यात घेऊन छावणी पोलिसांत हायवा ट्रक क्र. एमएच-२० डीई-३३३५ जमा केला. तसेच पथकाच्या वाहनाला अपघात होईल, अशा पद्धतीने चारचाकी क्र. एमएच-२० ईएफ-३३३५ चालविल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सदरील चारचाकीचा परवाना रद्द करून ती जप्त करण्याबाबतही पत्र दिले आहे.


नगरनाक्याकडून छावणीमार्गे वाळूने भरलेला हायवा ट्रक वेगाने येत होता. त्या हायवाच्या पाठीमागे मालकाची चारचाकी संरक्षणार्थ धावत होती. पाठलाग करण्यासाठी महसूलचे पथक सरसावताच हायवा मालकाने महसूल पथकाला पुढे जाऊ न देण्यासाठी चारचाकी मध्येच घुसविली. परिणामी, हायवाचालकाने धूम ठोकली. चारचाकी चालकही पळून गेला. मात्र, महसूलच्या पथकाने आयकर विभाग कार्यालयामागे त्यांना गाठले. शेवटी आयकर विभागामागे हायवा ट्रकमधील वाळू एका जागेवर टाकत असताना पथकाने पडकले. तेथेच गवांदे यांची स्वीफ्ट ही चारचाकीदेखील होती. याप्रकरणी छावणी पोलिसांत आणि आरटीओकडे तक्रार करण्यात आली आहे. हायवा ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. हा सगळा थरार नगरनाका ते आयकर विभागापर्यंतच्या अंतरात घडला.


तहसीलदारांनी कळविले
अप्पर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी कळविले आहे, २९ जून रोजी दुपारी ३.३० वा. छावणीमधून नगररोडकडे जात असताना महसूल पथकाला वाळूने भरलेला एक हायवा ट्रक येत असल्याचे आढळून आले. त्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्या ट्रकच्या मागे पांढºया रंगाची एक स्वीफ्ट चारचाकी होती. हायवाचा पाठलाग करीत असताना स्वीफ्ट चारचाकी चालकाने महसूल पथकाचे वाहन पुढे जाऊ दिले नाही. यामध्ये अपघात होण्याचा प्रसंग आला. हायवा ट्रक पळून जाण्यासाठी स्वीफ्टचालक गवांदे हा मदत करीत होता. दोन्ही वाहनांबाबत पोलिसांत, आरटीओमध्ये तक्रार दिली आहे.

Web Title:  The four-wheeler is full of sand-filled highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.