ग्रामीण रुग्णालयात बनावट प्रमाणपत्राचा झाला जन्म !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:03 AM2017-08-17T01:03:52+5:302017-08-17T01:03:52+5:30

येथील ग्रामीण रुग्णालयात बनावट प्रमाणपत्रांचा जन्म झाल्याने खळबळ उडाली आहे.

Fake certificate was born in rural hospital! | ग्रामीण रुग्णालयात बनावट प्रमाणपत्राचा झाला जन्म !

ग्रामीण रुग्णालयात बनावट प्रमाणपत्राचा झाला जन्म !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नड : येथील ग्रामीण रुग्णालयात बनावट प्रमाणपत्रांचा जन्म झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रमाणपत्राचा जनक कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या शिक्क्यांचा वापर करून बनावट प्रमाणपत्र देणारे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता वाढल्याने खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे हे रॅकेट कोण चालवित आहे, याचा छडा लावून दोषींविरूध्द कारवाई होणे आवश्यक असताना या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी अद्यापपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे यामागे गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील ग्रामीण रुग्णालयातून १३ जुलै २०१७ रोजी दिलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी रूग्णालयाच्या वरिष्ठ कार्यालयाने प्रकरण ग्रामीण पोलीस ठाण्याकडे पाठविले. प्रमाणपत्राची पडताळणी करताना हे प्रमाणपत्र ग्रामीण रुग्णालयातील आठ वैद्यकीय अधिकाºयांपैकी कुणीही दिलेले नाही आणि प्रमाणपत्रात उल्लेख केलेली महिला १२ जुलै ते १४ जुलै या कालावधीत औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात भरती झालेली नाही, असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्ता देगावकर यांनी दिल्याने या प्रमाणपत्राचा गुंता वाढला आहे.
जर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयाने हे प्रमाणपत्र दिले नाही तर मग कुणी दिले?, बनावट प्रमाणपत्र देण्याचा उद्देश काय?, अशी आणखी किती प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत तसेच प्रमाणपत्रांचा गैरवापर करण्यात आलेला आहे का? याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र, सदर रॅकेटचा पर्दाफाश होण्यासाठी प्रकरण पोलीसात जाणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: Fake certificate was born in rural hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.