पाणीपुरवठ्यासाठी टँकरला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:20 PM2019-07-02T23:20:16+5:302019-07-02T23:20:47+5:30

जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

Extension of Tanker till July 15 for water supply | पाणीपुरवठ्यासाठी टँकरला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

पाणीपुरवठ्यासाठी टँकरला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे ८०० टँकर सुरू : जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांची माहिती

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे भीषण संकट होते. मागील आठ-दहा दिवसांपासून काही मंडळांत पाऊस झाल्यामुळे जलस्रोत काही प्रमाणात भरले आहेत. त्यामुळे ११७४ पैकी सद्य:स्थितीत ३७३ टँकर बंद करण्यात आले असून, ८०१ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, आता टँकरबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले असून, त्यांनी १५ जुलैपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मुदतवाढ दिल्याचे जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार तहसीलदारांना होते. ते अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले आहेत. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत होती. मात्र, अजूनही अनेक मंडळांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे. आजही जिल्ह्यात ५९४ गावे आणि १२४ वाड्या तहानलेल्याच आहेत. त्यामुळे जिल्हाधिकºयांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली असून, ८०१ टँकरद्वारे या वाड्या आणि गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
यंदा लोकसभेच्या आचारसंहितेमुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार केला. त्यामध्ये दिंड्यांसोबत टँकर व आरोग्य पथकांसाठी तरतूद करण्यात आली नव्हती. त्यामुळे तातडीच्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यांतून पंढरपूरकडे जाणाºया जवळपास ५३ दिंड्यांसोबत ५३ टँकर व आरोग्य पथके पाठविण्यात आली आहेत. त्यासाठी ११ जुलै रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पातील तरतुदीचे पुनर्विनियोजन करण्यात येणार आहे. तेव्हा यंदाच्या दिंड्यासोबत पाठविण्यात आलेल्या टँकरसाठी १५ लाख रुपये व आरोग्य पथकांसाठी १० लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे. मागील वर्षी दिंड्यांसोबत दिलेल्या टँकरचे १३ लाख रुपयांचे बिल अदा करायचे आहे. त्यासाठीही १३ लाख रुपयांची तरतूद केली जाणार आहे, असे अध्यक्षा डोणगावकर यांनी सांगितले.

Web Title: Extension of Tanker till July 15 for water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.