‘एक शाम किशोर के नाम’ परभणीत रंगला कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:29 AM2017-11-15T00:29:09+5:302017-11-15T00:29:17+5:30

स्व़ किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील सिनेगायक उदय वाईकर यांनी आयोजित केलेल्या ‘एक शाम किशोर कें नाम’ या संगीत मैफलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़

'An Evening Kishore's Name' Parbhaniit Rangala Program | ‘एक शाम किशोर के नाम’ परभणीत रंगला कार्यक्रम

‘एक शाम किशोर के नाम’ परभणीत रंगला कार्यक्रम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्व़ किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील सिनेगायक उदय वाईकर यांनी आयोजित केलेल्या ‘एक शाम किशोर कें नाम’ या संगीत मैफलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़
१३ आॅक्टोबर रोजी ही मैफल पार पडली़ यावेळी अधिष्ठाता डॉ़विलास पाटील, मुख्य शास्त्रज्ञ डॉ़उदय खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी स्व़किशोरकुमार, स्व़डॉ़ मकरंद गळाकाटू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ सिनेगायक उदय वाईकर यांनी स्व़किशोर कुमार यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला़ त्यानंतर ‘माना जनाब ने पुकारा नही’, ‘अँचल कें तुझें मैं लेके चलू’, ‘हाल क्या हैं दिलों का न पुछो सनम’, ‘पग घुंगरू बांध मीरा नाचती’ आदी गिते सादर केली़ डॉ़उदय खोडके यांनी ‘कोरा कागज था मन मेरा’ हे गीत सादर करून मैफलीती रंगत आणली़ प्रकाश कुलकर्णी यांनी ‘मेरे नैना सावन भादो’, ‘हमे तुमसे प्यार कितना’ ही गीते सादर केली़ उदय वाईकर यांनी सादर केलेल्या ‘जिदंगी का सफर ए कैसा सफर’ या गीताने मैफलीची सांगता झाली़
कार्यक्रमास सुलभा देऊळकर, प्रा़सर्वोत्तम साडेगावकर, अनिकेत वाईकर यांनी सहभाग नोंदविला़ अपूर्वा अनिकेत वाईकर यांनी आभार मानले़ यावेळी स्वाती सांगळे, सुलभ दीक्षित, अश्विनी वाईकर, काकडे, श्रीपाद दीक्षित आदींची उपस्थिती होती़

Web Title: 'An Evening Kishore's Name' Parbhaniit Rangala Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.