भांडखोर पत्नी नको रे देवा ! पत्नी पीडितांचे देवाला साकडे; पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:56 AM2018-06-27T06:56:17+5:302018-06-27T06:56:21+5:30

पत्नी छळामुळे त्रस्त (पत्नी पीडित) पुरुषांनी वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ‘भांडखोर पत्नी नको रे देवा’ म्हणत पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा घालून पत्नीने दिलेल्या यातना उघड केल्या.

Do not want a brawler wife! The wife of the wife afflicted God; Pipal | भांडखोर पत्नी नको रे देवा ! पत्नी पीडितांचे देवाला साकडे; पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा

भांडखोर पत्नी नको रे देवा ! पत्नी पीडितांचे देवाला साकडे; पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा

औरंगाबाद : पत्नी छळामुळे त्रस्त (पत्नी पीडित) पुरुषांनी वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सिडको वाळूज महानगरात ‘भांडखोर पत्नी नको रे देवा’ म्हणत पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा घालून पत्नीने दिलेल्या यातना उघड केल्या.
वट पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी ‘सात जन्मी हाच पती मिळू दे’, ‘पतीला दीर्घायुष्य लाभू दे अशी याचना करीत वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वर्षानुवर्ष चालत आलेल्या या परंपरेला पत्नी पीडित पुरुष मंडळींनी छेद देण्याचा प्रयत्न केला.
पत्नीकडून होणारा छळ व कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या पत्नी पीडित पुरुष मंडळींनी मंगळवारी सिडको साईनगरातील पिंपळाच्या झाडाला पोस्टर चिकटवून उलट्या प्रदक्षिणा घालत, ‘खोटे-नाटे गुन्हे दाखल करुन छळणाऱ्या भांडखोर पत्नीपासून दूर ठेव’ म्हणत यमराजाला साकडे घातले. या पोस्टरवर ‘यमराजा आम्हाला ही भांडखोर बायको नको’, ‘नवºयाला त्रास देणाºया लबाड बायकांचा धिक्कार असो’, ‘यमराज लबाड बायकांना सेवा मुक्त करा’, ‘लबाड बायकोच्या त्रासातून मुक्त करा’ आदी घोषणा लिहिल्या होत्या.
पत्नी पीडितांनी नंतर गाणी गाऊन व विविध घोषणा देत अनोख्या पद्धतीने पौर्णिमा साजरी केली. यावेळी पत्नी पीडित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे, राहुल वाढवे, संजय नरवडे, प्रमोद तरवटे, नईम शेख, विशाल नांदरकर, माणिक परदेशी, चरणसिंग गुसिंगे, अरुण ठोंबरे, शिवराज कांबळे, प्रविण गाडे, नितिन गारजकर, पांडुरंग गांडुळे, संजय जाधव, कदिर शेख, मनोज परदेशी, कौतिक जोगदंडे, रामेश्वर नवले, मल्लेश कुºहा आदींसह पत्नी पीडित पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Do not want a brawler wife! The wife of the wife afflicted God; Pipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.