नंदनवन कॉलनीत दुर्गंधीयुक्त पाणी

By Admin | Published: July 28, 2014 12:43 AM2014-07-28T00:43:29+5:302014-07-28T01:04:25+5:30

औरंगाबाद : भावसिंगपुरा रोडवरील नंदनवन कॉलनीसह परिसरात नळाद्वारे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. हे पाणी गाळून तर सोडाच; पण उकळून पिण्याच्याही लायकीचे नाही.

Deodorant water in the Sanandan Colony | नंदनवन कॉलनीत दुर्गंधीयुक्त पाणी

नंदनवन कॉलनीत दुर्गंधीयुक्त पाणी

googlenewsNext

औरंगाबाद : भावसिंगपुरा रोडवरील नंदनवन कॉलनीसह परिसरात नळाद्वारे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. हे पाणी गाळून तर सोडाच; पण उकळून पिण्याच्याही लायकीचे नाही. यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नंदनवन कॉलनीत सध्या सिमेंटचे रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या खालून जुनी ३ इंच आकाराची खराब झालेली पाईपलाईन आहे, तसेच त्यास जोडूनच ड्रेनेज लाईन आहे. ही सडलेली पाईपलाईन काढून न टाकताच वरून सिमेंटच्या रस्त्याचे काम केले जात आहे. येथील ड्रेनेज चोकअप झाले आहे. तेच घाण पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून नळाद्वारे येत आहे. दुर्गंधीयुक्त काळ्या-तांबड्या रंगाचे पाणी येऊ लागल्यामुळे रहिवासी त्रस्त आहेत. रहिवाशांनी सांगितले की, मुळात ड्रेनेजची लाईन रस्त्याच्या एका बाजूने व पिण्याच्या पाण्याच्या लाईनच्या दुसऱ्या बाजूने टाकावी, असा नियम आहे. मात्र, नंदनवन कॉलनीत एकमेकांना लागूनच दोन्ही पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. कॉलनीच्या कॉर्नरवरील ड्रेनेजचे चेंबर ओव्हरफ्लो झाले आहे. चेंबरवरील ढापेही फुटून बाजूला पडले आहेत. चेंबरच्या बाजूला खोदकाम केले असता तेथे ड्रेनेजलाईन व पाईपलाईन एकमेकांना जोडून टाकल्याचे आढळले आहे. या परिसरात जुनी खराब झालेली पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकणे व ड्रेनेजलाईन काढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने टाकावी, अशी लेखी मागणी रहिवाशांनी महानगरपालिकेमध्ये केली आहे. कारण एकदा सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले तर पुन्हा येथील पाईपलाईन काढणे कठीण जाईल, असे येथील रहिवाशांनी सांगितले.
आज रविवारी नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी या परिसराला भेट दिली व पाहणी केली. येथील ड्रेनेजलाईन काढून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने टाकण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले.
नंदनवन कॉलनीत सिमेंटचा रस्ता होत असल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला, तसेच येथील पिण्याच्या पाण्याची जुनी पाईपलाईन खराब झाल्यामुळे तेथे नवीन पाईपलाईन टाकावी, अशी मागणीही केली. यावेळी येथील रहिवासी माणिकराव कवडे, विठ्ठल गडदे, सेवादास कांबळे, प्रवीण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

 

Web Title: Deodorant water in the Sanandan Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.