मोती तलाव ठरतोय ‘डेथ स्पॉट’

By Admin | Published: January 17, 2017 11:07 PM2017-01-17T23:07:47+5:302017-01-17T23:11:25+5:30

ज्ाालना : मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे.

'Death spot' for Moti Lake | मोती तलाव ठरतोय ‘डेथ स्पॉट’

मोती तलाव ठरतोय ‘डेथ स्पॉट’

googlenewsNext

ज्ाालना : एमआयडीसी परिसरातील कैलास शटर येथील चंद्रकांत पाईकराव (४५) यांनी मोती तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, शहरातील जुन्या जालना परिसरात असलेल्या या मोती तलावात दीड महिन्यात तीन जणांनी आत्महत्या केली असल्याने हे ठिकाण आता ‘डेथ स्पॉट’ होतो की काय, अशी भीती परिसरात व्यक्त होऊ लागली आहे.
मोतीबाग हे नगरपालिकेचे शहरातील एकमेव मोठे उद्यान आहे. उद्यानाच्या पाठिमागे निसर्गरम्य असा मोती तलाव आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने पावसाचे पाणी साठून रहावे यासाठी नगरपलिकेने यंदा या तलावातील गाळही काढला आहे. त्यामुळे तलावाची खोली वाढून तलावात मुबलक पाणीासाठा झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांच्या बोअरची पाणीपातळी वाढली आहे. परंतु, सुरक्षिततेच्या दृष्टीने या तलावाच्या कडेला कसलेही संरक्षण नसल्यामुळे हा तलाव जीवघेणा ठरू लागला आहे.
गेल्या दीड महिन्यात तिघांनी या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. यात यशवंतनगर येथील तरूण मयूर वाघ, एका महिला आणि मंगळवारी चंद्रकांत पाईकराव यांचा समावेश आहे. गेल्या सहा वर्षात या तलावामध्ये ४० जणांनी आत्महत्या केली असल्याची माहिती परिसरातील दुकानदार सांगत आहेत. सरक्षण भींत नसल्याने सहज तलावात उडी घेता येत असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, मयुर वाघ हा आत्महत्या करण्यापूर्वी या परिसरात काही काळ फिरत होता, असेही एका व्यापाऱ्याने सांगितले. त्याचे प्रेत पाण्याबाहेर काढल्यानंतर फिरत असलेलाच हा मुलगा असल्याने आपणाला धक्का बसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे तलावाला सरंक्षण भींत असणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया या भागातील रहिवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, या घटनांना पालिका कितपत गांभिर्याने घेऊन सुरक्षिततेबाबत कार्यवाही करते, याकडे आता शहरवासियांचे लक्ष आहे.

Web Title: 'Death spot' for Moti Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.