दिन दिन दिवाळी.. गायी-म्हशी ओवाळी...

By Admin | Published: October 25, 2014 11:46 PM2014-10-25T23:46:42+5:302014-10-25T23:49:07+5:30

लातूर : एकिकडे फटाके वाजवत नवीन कपडे व पंचपक्वान्न तयार करून दिवाळीचा सण साजरा करणारे, तर दुसरीकडे आपल्या संसारात आर्थिक हातभार लावणाऱ्या

Day by day Diwali .. Cows and buffaloes ... | दिन दिन दिवाळी.. गायी-म्हशी ओवाळी...

दिन दिन दिवाळी.. गायी-म्हशी ओवाळी...

googlenewsNext


लातूर : एकिकडे फटाके वाजवत नवीन कपडे व पंचपक्वान्न तयार करून दिवाळीचा सण साजरा करणारे, तर दुसरीकडे आपल्या संसारात आर्थिक हातभार लावणाऱ्या गायी-म्हशींची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून लातुरात गवळी समाजाच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. पाडव्याच्या दिवशी सायंकाळी लक्ष्मी मंदिरासमोर आपल्या पशुधनाची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गवळी समाजातील अनेक तरुणांनी काठी फिरविण्याचा खेळ सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले.
गेल्या ५० वर्षांपासून लातूर शहरात गवळी समाज बांधव अनोख्या पद्धतीने दिवाळीचा सण साजरा करतात. आपल्या संसारात व आपल्या आर्थिक उन्नतीमध्ये महत्वाचा वाटा असलेल्या पशुधनांना सोबत घेऊनच दिवाळीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी गवळी समाज बांधव आपल्या पशुधनासमवेत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढतात. दरवर्षी या मिरवणुकीत समाजबांधवांचा उत्साह आणि नागरिकांनाही पशुधनाच्या मिरवणुकीचे कुतूहल असते. गांधी चौकात असलेल्या लक्ष्मी मंदिरापासून गवळी समाजाच्या दिवाळी सणाची खरी सुरुवात होते.
पशुधनाची पूजा झाल्यावरच सर्व समाज बांधव आपल्या पशुधनासमवेत मिरवणुकीत सहभागी होतात. दिन दिन दिवाळी.. गायी-म्हशी ओवाळी... या प्रमाणे दिवाळीचा सण हा नुसताच मानवजातीचा नसून, त्यात पशुधनाचाही सहभाग परंपरेनुसार चालत आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून दिवाळी सणाची संस्कृती हळुहळू बदलत चालली आहे. शुभेच्छा देण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत.
संगणकाचे युग आल्याने दिवाळीचा खरा आनंद लोप पावत चालला आहे. त्यातही गवळी समाज बांधवांनी आपली परंपरा अखंडपणे कायम ठेवली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Day by day Diwali .. Cows and buffaloes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.