लातुरात डेंग्यूसदृश्य तीन रुग्ण आढळले

By Admin | Published: August 19, 2016 12:48 AM2016-08-19T00:48:40+5:302016-08-19T01:01:36+5:30

लातूर : लातूर शहरात तापीचे रूग्ण वाढत असून, तीन डेंग्यूचे संशयित रूग्ण आढळले आहेत़ त्यांच्या रक्ताचे नमूने नांदेडच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत़

Danger in Latur found three patients | लातुरात डेंग्यूसदृश्य तीन रुग्ण आढळले

लातुरात डेंग्यूसदृश्य तीन रुग्ण आढळले

googlenewsNext


लातूर : लातूर शहरात तापीचे रूग्ण वाढत असून, तीन डेंग्यूचे संशयित रूग्ण आढळले आहेत़ त्यांच्या रक्ताचे नमूने नांदेडच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत़ दरम्यान, मनपाने शहरात अ‍ॅबेटिंग मोहिमेसह जनजागृती सुरू केली आहे़
लातूर शहरात मागील पंधरा दिवसात ताप, सर्दी खोकल्याचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत़ शासकीय वैद्यकी महाविद्यालयात तसेच शहरातील खाजगी रूग्णालयात या रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ मागील पंधरा दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दीच्या रूग्णांत वाढ झाली आहे़ तसेच डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे डेंग्यूसदृश्य आजाराच्या रूग्णातही वाढ झाली आहे़ आठवडाभरात तीन डेंग्यू संशयित रूग्ण आढळले असून, त्यांच्या रक्ताचे नमुने नांदेड येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत़ आढळून आलेले रूग्ण हे खोरे गल्ली, विश्वनाथपुरम व औसा शहरातील बौद्ध नगर या परिसरातील असून, आरोग्य विभागाच्या वतीने या भागात अ‍ॅबेटिंग मोहीम राबविली जातेय़ (प्रतिनिधी)

Web Title: Danger in Latur found three patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.