बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीची कामे तपासणीनंतरच पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:52 PM2017-08-16T23:52:23+5:302017-08-16T23:52:23+5:30

पाऊस कमी झाल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासूनच पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या़

Complete the repair work on the closed door after inspection | बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीची कामे तपासणीनंतरच पूर्ण करा

बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीची कामे तपासणीनंतरच पूर्ण करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पाऊस कमी झाल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासूनच पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या़
जलसंपदा लघूसिंचन, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे, नांदेड पाटबंधारे दक्षिण, उत्तर विभागाअंतर्गत कोल्हापुरी बंधाºयांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत खोतकर बोलत होते़ जिल्ह्यात आजघडीला १७६ कोल्हापुरी बंधारे असून त्यासाठी १२ हजार ४६५ दरवाजे आहेत़ त्यातील सध्या कार्यरत दरवाजांची संख्या ८ हजार ६७१ असून तब्बल ३ हजार ७९४ दरवाजे अद्यापही नादुरुस्त आहेत़ टंचाई आणि अतिवृष्टीमुळे नुकसान टाळण्यासाठी प्रकल्पाचे दरवाजे उघडता व बंद करता आली पाहिजेत़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या १८ क्रमांकाच्या दरवाजाची व कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या तपासणी करावी़ प्रकल्पातील पाणी वाहून जाणार नाही, याबाबत दक्षता घेवून दुरुस्तीची कामे करावीत़ पुढील पाणीटंचाई लक्षात घेऊन कोल्हापुरी बंधाºयातील साठवलेले पाणी वाहून जाऊ नये यासाठी दक्ष रहावे़ दरवाजाची किरकोळ दुरुस्ती, नादुरुस्त दरवाजा, बांधकाम व इतर दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित विभाग किंवा आमदार निधीतून खर्च करण्यासाठी प्रयत्न करावा़ ज्या विभागाने कोल्हापुरी बंधारे बांधली त्यांनी बंधाºयांची देखभाल पूर्ण करावी़ यासाठी वेळेत दखल घेऊन यंत्रणांनी सतर्क रहावे़ यावेळी बैठकीला आ़ अमरनाथ राजूरकर, आ़हेमंत पाटील, आ़डी़पी़सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, आयुक्त गणेश देशमुख, अधीक्षक अभियंता एसक़े़सबीनवार उपस्थित होते़

Web Title: Complete the repair work on the closed door after inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.