जिल्हाधिका-यांचा बूट गेला चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:11 AM2017-12-01T01:11:22+5:302017-12-01T01:11:28+5:30

महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात स्मार्टसिटीच्या बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी नवल कि शोर राम यांचा बूट गुरुवारी चोरीला गेला

 Collector stole the stolen | जिल्हाधिका-यांचा बूट गेला चोरीला

जिल्हाधिका-यांचा बूट गेला चोरीला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात स्मार्टसिटीच्या बैठकीसाठी आलेले जिल्हाधिकारी नवल कि शोर राम यांचा बूट गुरुवारी चोरीला गेला. एकदम ‘अफलातून’ हा प्रकार घडल्यामुळे संशोधन केंद्रात असलेल्या महापौरांपासून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. शिवाय बैठकीचा शेवट असा बूटचोरीने झाल्यामुळे अनेकांचे चेहरे पडले.
बूट न सापडल्यामुळे जिल्हाधिकारी सॉक्ससह कारमधून निवासस्थानी गेले. त्यांनादेखील हा प्रकार पचनी पडला नाही; परंतु शेवटी घटना घडल्यामुळे त्यांनीदेखील खूप काही प्रतिक्रिया दिल्या नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात स्मार्टसिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रात जाण्यापूर्वी पादत्राणे काढून जावे लागत असल्याने सर्वांची पादत्राणे बाहेरच होती.
त्या बैठकीला मनपाचे प्रभारी आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्ष उद्योग प्रधान सचिव सुनील पोरवाल हे गेल्यानंतर उर्वरित सर्व अधिकारी, मनपाचे पदाधिकारी व सादरीकरण करणारे एक शिष्टमंडळ बाहेर पडले. सर्व जण निघून गेल्यानंतर जिल्हाधिकारी, महापौर, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता पादत्राणे घालून जाण्याच्या
घाईत होते. त्यावेळी जिल्हाधिकाºयांचा बूट चोरीला गेल्याचे समोर आले.

Web Title:  Collector stole the stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.