शहरात पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाला मारहाण; गुन्हा दाखल

By Admin | Published: June 26, 2017 12:38 AM2017-06-26T00:38:14+5:302017-06-26T00:39:37+5:30

जालना: उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.

City police beat up the Gooding Squad; Filed the complaint | शहरात पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाला मारहाण; गुन्हा दाखल

शहरात पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाला मारहाण; गुन्हा दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना: उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. शहरातील कन्हैय्यानगर भागात रविवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील ज्या भागात नागरिक उघड्यावर शौचास बसतात, अशी ठिकाणे निष्काषित करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पालिकेच्या स्वच्छता विभागांनी कारवाई सुरू केली आहे. मोहिमे अंतर्गत शनिवारी सकाळी
स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे पथकासह कन्हैयानगर परिसरात गेले. पोलिसांचे एक वाहनही पथकासोबत होते.
पथकातील कर्मचाऱ्यांनी उघड्यावर शौच करणाऱ्या नऊ जणांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनात बसविले. त्या वेळी संशयित सिद्धार्थ गोविंदराव अंभोरे (रा.कन्हैयानगर) तिथे आला. स्वच्छता निरीक्षक लोंढे यांना शिवीगाळ
केली. कारवाईसाठी तुमच्याकडे कोणता जीआर आहे का, असे म्हणत लोेंढे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच पोलिसांच्या वाहनातील नऊ जणांना खाली उतरवून देत
शासकीय कामात अडथळा आणल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अशोक लोंढे यांच्या फिर्यादीवरून संशयित सिद्धार्थ अंभोरे विरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. काँस्टेबल वाघमारे तपास करत आहे.

Web Title: City police beat up the Gooding Squad; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.