औरंगाबाद येथील कार्गो टर्मिनल पूर्णत्वाकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:03 AM2018-01-20T00:03:04+5:302018-01-20T00:03:14+5:30

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे आले असून, महिनाभरात सुरक्षेसंदर्भात परवानगी मिळताच ही सेवा सुरूहोईल,असे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.

Cargo terminal completion in Aurangabad ... | औरंगाबाद येथील कार्गो टर्मिनल पूर्णत्वाकडे...

औरंगाबाद येथील कार्गो टर्मिनल पूर्णत्वाकडे...

googlenewsNext
ठळक मुद्देमहिनाभराची प्रतीक्षा : मंजुरी मिळताच होणार कार्गो सेवेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलचे काम पूर्णत्वाकडे आले असून, महिनाभरात सुरक्षेसंदर्भात परवानगी मिळताच ही सेवा सुरूहोईल,असे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.
विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी कार्गो सेवा महत्त्वाची ठरते. चिकलठाणा विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली. या सेवेला प्रतिसाद मिळत असून, दररोज या ठिकाणाहून औद्योगिक मालाची वाहतूक होत आहे. ही सेवा सुरू करताना पुढील तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलमधील संगणकीय यंत्रणेसाठी निधी मंजूर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले; परंतु काही कारणांमुळे त्यास विलंब झाला; परंतु काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलच्या कामाला गती देण्यात आली. देशांतर्गत कार्गो टर्मिनल सुरूझालेल्या जुन्या टर्मिनल इमारतीत आवश्यक ते बदल आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही किरकोळ कामे शिल्लक असल्याचे समजते. विमानतळावरून सध्या आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा उपलब्ध नसली तरी मुंबईमार्गे दरवर्षी दीड हजार टन माल निर्यात केला जातो. विमानतळावर आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर दरवर्षी जवळपास तीन हजार टन माल निर्यात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कमी वेळेत मालाची निर्यात
या सेवेमुळे शहरातून कमीत कमी वेळेत मालाची निर्यात होण्यास हातभार लागेल आणि मुंबईमार्गे निर्यात करताना होणाºया त्रासातून कायमची सुटका होईल. त्यामुळे या सेवेसाठी उद्योजक, व्यावसायिक उत्सुक असून, ही सेवा लवकरात लवकर सुरूकरण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरूआहेत. सुरक्षेसंदर्भात मंजुरी मिळताच ही सेवा सुरूहोईल. महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे विमानतळाच्या अधिकाºयांनी सांगितले.

Read in English

Web Title: Cargo terminal completion in Aurangabad ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.