कॅम्पस क्लबतर्फे ‘ºिहदम आॅफ युनिटी’चे प्रोझोनमध्ये आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:21 AM2018-08-14T01:21:33+5:302018-08-14T01:22:10+5:30

स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी प्रोझोन मॉल येथे दि. १५ आॅगस्ट रोजी सायं. ५ ते ९ या वेळेत ‘ºिहदम आॅफ युनिटी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या कार्यक्रमादरम्यान कॅम्पस क्लबच्या निवडक विद्यार्थ्यांनाही सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

Campus Clubs organize 'God of Unity' in ProZone | कॅम्पस क्लबतर्फे ‘ºिहदम आॅफ युनिटी’चे प्रोझोनमध्ये आयोजन

कॅम्पस क्लबतर्फे ‘ºिहदम आॅफ युनिटी’चे प्रोझोनमध्ये आयोजन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅम्पस क्लबच्या सदस्यांसाठी प्रोझोन मॉल येथे दि. १५ आॅगस्ट रोजी सायं. ५ ते ९ या वेळेत ‘ºिहदम आॅफ युनिटी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या कार्यक्रमादरम्यान कॅम्पस क्लबच्या निवडक विद्यार्थ्यांनाही सादरीकरण करण्याची संधी मिळेल.
यामध्ये औरंगाबाद शहरातील आॅफ बीट, अगम्ना, एमएच २०, विंग्स आॅफ फायर आणि एनओबी हे बँडस् एकत्र येऊन एकतेचा संदेश देत वेगवेगळ्या प्रकारचे श्रवणीय संगीत सादर करतील.
या कार्यक्रमात कॅम्पस क्ल्बचे विद्यार्थी सहभागी होऊन गिटार किंवा रॉक बँड या प्रकारातील त्यांना अवगत असणारे कोणतेही वाद्य वाजवू शकतात.
दि. १५ रोजी निवड चाचणी
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दि. १५ आॅगस्ट रोजी दु. १२ ते २ या वेळेत लोकमत हॉल, लोकमत भवन येथे निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे, त्यांनी आपल्या वाद्यासह निवड चाचणीसाठी उपस्थित राहावे. केवळ कॅम्पस क्लबचे सबस्क्रायबर या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क - ९६६५८०९७७७.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत कॅम्पस क्लबचे सबस्क्रिप्शन घेतलेले नाही, ते कार्यक्रमस्थळी सबस्क्रिप्शन घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. याठिकाणी सबस्क्रिप्शन घेतल्यावर विद्यार्थ्यांना स्कूूल बॅग देण्यात येईल.

Web Title: Campus Clubs organize 'God of Unity' in ProZone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.