बीटी बियाणे उत्पादकांवर करमाडमध्ये गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:06 AM2017-12-01T01:06:01+5:302017-12-01T01:06:15+5:30

शेतक-यांना बोगस बियाणे देऊन त्याच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या बियाणे कंपनी व कृषिसेवा केंद्रांविरुद्ध कृषी विभागाच्या अहवालानुसार करमाड पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. काँग्रेस पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी सुमारे आठ तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर रात्री गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 Bt seed producers filed criminal cases against them | बीटी बियाणे उत्पादकांवर करमाडमध्ये गुन्हे दाखल

बीटी बियाणे उत्पादकांवर करमाडमध्ये गुन्हे दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंद्रा/करमाड : शेतक-यांना बोगस बियाणे देऊन त्याच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या बियाणे कंपनी व कृषिसेवा केंद्रांविरुद्ध कृषी विभागाच्या अहवालानुसार करमाड पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. काँग्रेस पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांसह शेतकºयांनी सुमारे आठ तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर रात्री गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कपाशीवरील बोंडअळीमुळे औरंगाबाद तालुक्यात शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याला बीटी बियाणांचे उत्पादक जबाबदार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने करमाड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनकरण्यात आले. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास कृषी विभागाचे अधिकारी करमाडमध्ये दाखल झाले आणि रात्री ८ वाजेच्या सुमारास कुंभेफळ शिवारात कापसाचे पंचनामे सुरू करण्यात आले. पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. औरंगाबाद तालुका काँग्रेसच्या वतीने औरंगाबाद- जालना मार्गावर केम्ब्रिज शाळेजवळील चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, माजी आ. डॉ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शेतकरी, आमदार आणि काँग्रेसचे नेते सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले. याठिकाणी कापसाच्या बीटी बियाणे उत्पादन करणाºया कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तालुक्याचा विषय (पान २ वर)
ठाण्याच्या परिसरातच भोजन केले...
शेतकºयांनी यावेळी कंपन्यांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका घेत दुपारी ठाण्याच्या प्रांगणातच भोजन केले. सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांनी सर्वांची समजूत काढत अर्ज घेण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकºयांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय हलणार नसल्याची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक शेळके यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक आम्ले यांना माहिती दिली. आम्ले यांनीही शेतकरी तसेच काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा केली; परंतु ती व्यर्थ ठरली. कुंभेफळ येथील शेतकरी हरिभाऊ साहेबराव गोजे, तुळशीराम रंगनाथ गोजे, गणेश अरुण गोजे हे कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून दुपारपासून पोलीस ठाण्यात आपला तक्रार अर्ज घेऊन हजर होते. परंतु सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. ठिय्या दिलेले शेतकरी आणि नेते रात्रीपर्यंत पोलीस ठाण्यासमोरच होते. पोलिसांनी कृषी विभागाशी संपर्क साधला. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक आशिष काळुसे, (पान २ वर)
या कंपन्यांविरुद्ध गुन्हा
न्यूजिविड कंपनी (वाण- भक्ती), कावेरी सीड्स कंपनी (वाण- एटीएम), आदित्य सीड्स (वाण- कॉटबँक), बायर कंपनी (वाण- फर्स्ट क्लास) यांच्याविरुध्द बोगस बियाणे पुरविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांनी सांगितले. याशिवाय हे बियाणे विकणाºया करमाडमधील तीन विक्रेत्यांविरुध्दही गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title:  Bt seed producers filed criminal cases against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.