गं्रथ अधिक काळ जगतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:06 AM2018-07-09T01:06:52+5:302018-07-09T01:08:04+5:30

गं्रथ हजार वर्षांहून अधिक काळ जगत असल्याचे प्रतिपादन साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. के. डी. सोनकांबळे व डॉ. तोहर एच. पठाण संपादित डॉ. परशुराम गिमेकर यांच्यावर लिखित ‘कस्तुरी’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त केले.

Books live longer | गं्रथ अधिक काळ जगतात

गं्रथ अधिक काळ जगतात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गं्रथ हजार वर्षांहून अधिक काळ जगत असल्याचे प्रतिपादन साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. के. डी. सोनकांबळे व डॉ. तोहर एच. पठाण संपादित डॉ. परशुराम गिमेकर यांच्यावर लिखित ‘कस्तुरी’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त केले.
प्रा.फ.मुं. शिंदे हस्ते व प्रा.अविनाश डोळस यांच्या अध्यक्षतेखाली मजनू हिल येथील मौलाना आझाद संशोधन सभागृहात उपस्थितीत रविवारी गौरव गं्रथाचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी डॉ. सतीश बडवे, डॉ. गणेशराज सोनाळे, प्रा.डी.बी.जगत्पुरीया यांंच्यासह साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डोळस म्हणाले, गं्रथ हजार वर्षांहून अधिक जगतात. प्रत्येकाचे जगणे वेगळे असते. त्या जगण्याचे प्रश्न व शोधलेली उत्तरे वेगळी असतात. जगत असताना सांस्कृतिक संघर्ष असतो. त्याचेही वेगळे महत्त्व असते. त्याचे प्रतिबिंब गौरव गं्रथात, आत्मचरित्रात उमटत असते. कस्तुरी हा ग्रंथ १०० वर्षांहून अधिक काळ उपलब्ध राहील. गिमेकर यांच्यावरील गौरव ग्रंथात सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शिक्षणातून परिवर्तन होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक चळवळीचा आदर्श घेऊन अनेक जण परिवर्तनातून पुढे आले. गिमेकर यांनादेखील चळवळीच्या पार्श्वभूमी दृष्टी आली. साहित्य एका जातीचे होऊ नये, विशिष्ट जातीचे ब्रॅण्ड होऊ नये. याची काळजी घेतली जावी, असे सांगून डोळस यांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्यासह इतर साहित्यिकांचे दाखले दिले. याप्रसंगी प्रा. शिंदे यांनी गौरव ग्रंथाला शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक डॉ. सोनकांबळे, डॉ. पठाण यांनी केले. डॉ. सोनाळे, प्रा.जगत्पुरीया, डॉ. बडवे यांनी गौरव ग्रंथावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे यांनी केले.

Web Title: Books live longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.