ब्लॅकमेल करीत मुलीवर अत्याचार

By Admin | Published: December 23, 2014 12:40 AM2014-12-23T00:40:18+5:302014-12-23T00:57:12+5:30

औरंगाबाद : एका सोळा वर्षीय मुलीला तिचे विवस्त्र व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध न्यायालयाच्या

Blackmail girls oppression | ब्लॅकमेल करीत मुलीवर अत्याचार

ब्लॅकमेल करीत मुलीवर अत्याचार

googlenewsNext


औरंगाबाद : एका सोळा वर्षीय मुलीला तिचे विवस्त्र व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सूर्यकांत शिंगाडे (२३, रा. नागसेननगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. शिंगाडे याने डिसेंबर २०१२ ते जानेवारी २०१३ या कालावधीत एका सोळा वर्षीय मुलीला तुझे विवस्त्र चित्रीकरण माझ्याकडे आहे, ते इंटरनेटवर टाकेल, अशी धमकी दिली. या धमकीच्या आधारे तो तिचे लैंगिक शोषण करू लागला. त्यातच या मुलीला दिवस गेले. हे समजल्यानंतर तिला आणि घरच्यांना धक्काच बसला तेव्हा शिंगाडेच्या कुटुंबाला मुलीच्या कुटुंबाने घडलेला प्रकार सांगितला. मग तुम्ही पोलिसात तक्रार करू नका. आम्ही दोघांचे लग्न लावून देतो, असे त्यांनी सांगितले. दोघांचा मग १२ जुलै रोजी विवाह पार पडला. त्यानंतर मुलीने एका मुलाला जन्म दिला. तेव्हा मात्र, त्या कुटुंबाने मूल आमचे नाही, असे म्हणत त्या मुलीला घरातून बाहेर काढले. शेवटी पीडित मुलीने उस्मानपुरा ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनीही त्यावेळी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला होता.
अखेर मुलीने न्यायालयात दाद मागितली. तेव्हा न्यायालयाने वरील आदेश पोलिसांना दिले.

Web Title: Blackmail girls oppression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.