बापरे... सांधेदुखीचे शंभरपेक्षा अधिक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:40 PM2018-10-11T23:40:09+5:302018-10-11T23:40:47+5:30

वाढत्या वयासह जीवनशैलीतील बदल, लठ्ठपणा, फळभाज्यांच्या वाढीसाठी होणारा रासायनिक खतांचा वापर, पोषक आहाराचा अभाव, अशा अनेक कारणांनी सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे. सातत्याने सांधे दुखणे ही संधिवाताची सुरुवात असू शकते. सांधेदुखीचे शंभरापेक्षा अधिक प्रकार आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूप येण्यापूर्वीच खबरदारी घेण्याची गरज असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात म्हणाले.

Bapar ... More than a hundred types of arthritis | बापरे... सांधेदुखीचे शंभरपेक्षा अधिक प्रकार

बापरे... सांधेदुखीचे शंभरपेक्षा अधिक प्रकार

googlenewsNext
ठळक मुद्देजागतिक संधिवात दिन : अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख चंद्रकांत थोरात यांच्याशी संवाद

औरंगाबाद : वाढत्या वयासह जीवनशैलीतील बदल, लठ्ठपणा, फळभाज्यांच्या वाढीसाठी होणारा रासायनिक खतांचा वापर, पोषक आहाराचा अभाव, अशा अनेक कारणांनी सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे. सातत्याने सांधे दुखणे ही संधिवाताची सुरुवात असू शकते. सांधेदुखीचे शंभरापेक्षा अधिक प्रकार आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूप येण्यापूर्वीच खबरदारी घेण्याची गरज असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात म्हणाले.
संधिवाताबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चालण्याची दुरावलेली सवय, वाढते वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली, यामुळे भारतात संधीवाताचे प्रमाण वाढत आहे. जागतिक संधिवात दिनानिमित्त सांधेदुखीविषयी डॉ. चंद्रकांत थोरात यांच्याशी संवाद साधण्यात आला. डॉ. थोरात म्हणाले, शरीरातील सांध्यांमधील होणाऱ्या आजारांना साधारणपणे सांधेदुखी असे म्हणतात. सांध्यातील दोन हाडांमध्ये कमीत कमी घर्षण व्हावे, यासाठी एक जाड गुळगुळीत कार्टिलेज आणि वंगणरुपी द्रव असते. वाढते वय, रोगप्रतिकारशक्तीतील बिघाड, लठ्ठपणा, अनुवंशिकता, जंतूसंसर्ग, बदलेली जीवनशैली, अशा विविध कारणांनी सांध्यातील वंगणास इजा होऊन हाडांतील घर्षण वाढते. परिणामी नसा घासून वेदना व सूज येते. सांधेदुखीची सुरुवात असल्यास वेदनांची तीव्रता वाढत जाते.
सांधेदुखीच्या प्रकारांविषयी बोलताना डॉ. थोरात म्हणाले, याचे शंभरपेक्षा जास्त प्रकार आहेत. वयोमानानुसार होणारा संधिवात, आमवात, रक्तातील युरिक अ‍ॅसिडच्या वाढत्या प्रमाणामुळे, जंतूसंसर्गामुळे सांधेदुखी, पाठीच्या मणक्यातील सांधेदुखी असे क ाही मुख्य प्रकार आहेत. यामध्ये वयोमानानुसार होणाºया संधिवाताचे सर्वाधिक प्रमाण आहे. वयाच्या ५० ते ६० वर्षांनंतर या आजाराचे प्रमाण अधिक आहे. यात गुडघा, खुबा, मणका, हाताच्या बोटातील सांधे म्हणजे शरीरातील ज्या सांध्यावर अधिक भार असतो, ते बाधित होतात.
वयाच्या विशीत मणक्याचा संधिवात
मणक्यातील संधिवात हा संधिवाताचा प्रकार प्रामुख्याने पुरुषांमध्ये साधारण वयाच्या विशीत होत आहे. यात पाठीच्या मध्यभागातील मणक्यांच्या हालचालीत अखंडपणा येतो. तर पुरुषांच्या तुलनेत आमवाताचे प्रमाण महिलांमध्ये ३ ते ४ पटीने अधिक आहे. आमवाताचे नेमके कारण अजूनही अज्ञात आहे. संधिवातापासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन आटोक्यात ठेवणे, बैठी जीवनशैली टाळणे, व्यसनांपासून दूर राहाणे, या प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे, असे डॉ.थोरात म्हणाले.

Web Title: Bapar ... More than a hundred types of arthritis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.