औरंगाबादचा ओला कचरा नारेगावात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:59 AM2018-03-29T00:59:43+5:302018-03-29T11:32:46+5:30

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शहरातील कचराप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कचरा कुठे टाकावा या मुद्यावर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली असून, उद्या नारेगाव येथे कचरा टाकण्याचा निर्णय झाल्यास तेथे पूर्वीप्रमाणे मिक्स कचरा अजिबात टाकण्यात येणार नाही. ओला कचरा तेथे टाकण्यात येईल, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. नागरिकांना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे.

Aurangabad's wet garbage naregaon? | औरंगाबादचा ओला कचरा नारेगावात ?

औरंगाबादचा ओला कचरा नारेगावात ?

googlenewsNext
ठळक मुद्देप्रभारी आयुक्त : आता शहरात कुठेही कचरा पडून राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शहरातील कचराप्रश्नी अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कचरा कुठे टाकावा या मुद्यावर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समितीने निर्णय घ्यावा, अशी मुभा दिली असून, उद्या नारेगाव येथे कचरा टाकण्याचा निर्णय झाल्यास तेथे पूर्वीप्रमाणे मिक्स कचरा अजिबात टाकण्यात येणार नाही. ओला कचरा तेथे टाकण्यात येईल, असे महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. नागरिकांना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेनारेगाव कचरा डेपोत कचरा टाकण्यास मनाई केली होती. या निर्णयाला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बुधवारी या याचिकेवर अंतिम निर्णय देण्यात आला. दरम्यान, पत्रकारांसोबत बोलताना राम म्हणाले की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात जागेचा मोठा प्रश्न आहे. महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कोठेही कचºयावर प्रक्रिया करण्यात येईल. यासंदर्भात अंतिम निर्णय शासनाने नेमलेल्या समितीला घ्यावा लागणार आहे. राज्य शासनाने कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी डीपीआरला मंजुरी दिली. यानुसार पुढील तीन महिन्यांत यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येईल.
यापूर्वीही मनपाला नारेगावच्या आंदोलकांनी चार महिन्यांची मुदत दिली होती. तेव्हा मनपाने काहीच केले नाही, या थेट प्रश्नावर महापौरांनी हस्तक्षेप करीत नमूद केले की, तेव्हा आमच्याकडे डीपीआर मंजूर नव्हता. आता ८० कोटींचा डीपीआर मंजूर आहे. ही आमच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. आता सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला असला तरी महापालिकेची यंत्रणा स्वस्थ बसणार नाही. उलट जोमाने काम करणार आहे.
शहरात इंदौरचे प्रतिबिंब दिसेल
शहरात ४०० मेट्रिक टन कचरा निघतो. आमच्या यंत्रणेत काम करणाºया एखाद्या कर्मचाºयाने चुकीच्या पद्धतीने कुठे कचरा नष्ट केला, तर त्यावर निश्चित कारवाई होईल. येणाºया काही दिवसांमध्ये औरंगाबादचा निश्चित कायापालट होणार आहे. इंदौर शहराचे प्रतिबिंब येथे दिसेल, असा दृढविश्वास प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.
संपूर्ण शहरावर हे संकट
कचºयाचा प्रश्न मनपाशी निगडित आहे. या जबाबदारीतून मनपा कधीच पळणार नाही. मात्र, ही समस्या पूर्ण शहराची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून मदतीसाठी पुढे आले पाहिजे. सर्वांच्या सहकार्यामुळेच शहर स्वच्छ व सुंदर होणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

Web Title: Aurangabad's wet garbage naregaon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.