औरंगाबादेत कचऱ्याचा ‘खेळ’ मांडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:44 AM2018-07-24T00:44:51+5:302018-07-24T00:45:24+5:30

शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.

Aurangabad's trash made 'game'! | औरंगाबादेत कचऱ्याचा ‘खेळ’ मांडला!

औरंगाबादेत कचऱ्याचा ‘खेळ’ मांडला!

googlenewsNext
ठळक मुद्देतनातणी : पाच महिन्यांपासून ते नेते, तेच अधिकारी व त्याच विषयाच्या बैठका

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम्यान कचºयाच्या समस्येचा लोकप्रशासन पातळीवर ‘खेळ’ मांडला आहे.
सोमवारी विभागीय आयुक्तालयात घनकचरा संनियंत्रण समितीची २५ वी बैठक झाली. बैठकीत तेच नेते, तेच अधिकारी आणि तोच पाच महिन्यांपासून चघळला जात असलेला विषय होता. यामध्ये नावीन्य असे काहीही नव्हते; परंतु बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर आणि खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात गरमागरम चर्चा झाली.
शेवटी दोन्ही बाजूंनी ‘डिफेन्सिव्ह मूड’ ची भूमिका घेतल्यानंतर पुढे काय करायचे यावर मंथन झाले. बैठकीच्या सुरुवातीलाच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आक्रमकपणे मुद्दे मांडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग विभागीय आयुक्तांनी संनियंत्रण समितीची जबाबदारी आणि पालिकेची जबाबदारी काय आहे, याचा पर्दाफाश केला. कचरा उचलण्याची मूळ जबाबदारी पालिकेची आहे. महापौर, आयुक्त आणि पदाधिकाºयांनी नियोजन केले पाहिजे, समिती पाठपुरावा करण्यासाठी स्थापन केली आहे. पालिकेला याप्रकरणी जाब विचारण्याचे सोडून विभागीय आयुक्तांना जाब कशासाठी विचारला जात आहे.
पालिका काहीच करणार नसेल तर त्याला मी काय करणार, माझ्यावर आरोप कशाला करता, मला माझे काम करू द्या, मला राजकारणात रस नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
मागील आठवड्यात खा.खैरे यांनी विभागीय आयुक्त आणि विधानसभा अध्यक्ष बागडे यांच्यामुळे कचरा प्रश्न सुटत नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सोमवारच्या बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता होती.
त्या अनुषंगानेच सामान्य प्रशासनाने पोलीस बंदोबस्ताची तयारी करून ठेवली होती. परंतु बैठकीत दोन्ही बाजूंनी झालेले वाद नंतर सामोपचाराने चर्चेला घेण्यात आल्याने पोलीस बोलावण्याची वेळ आली नाही.
...अन् संजय शिरसाट भडकले
मिटमिटा येथील जागेचे नाव काढले की, आ. शिरसाट जाम भडकले. शहरातील प्रत्येक ठिकाणी असे प्रकार होत असतील तर अनेक वर्षे हा प्रश्न सुटणारच नाही, असे मत आयुक्त डॉ.निपुण यांनी व्यक्त केले. जैस्वाल म्हणाले, एक ते दीड हजार लोकांसाठी १५ लाख लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. पालिकेतील सत्ताधाºयांवर सामान्य जनतेतून रोष निर्माण होतो आहे.
अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा
खा.खैरे म्हणाले, कचºयाची समस्या पूर्ण देशात आहे. दिल्लीसारख्या शहरातही यावरून आंदोलने होत आहेत. आज प्रशासनाला शेवटचा दम दिला आहे. यापुढे आम्ही सहन करणार नाही. हर्सूल, पडेगाव येथे पोलीस बंदोबस्ताचा वापर केला जाईल. यासाठी आयुक्तांनी पोलीस बंदोबस्त देण्यास सूचित केले आहे. साडेचार कोटी रुपयांच्या मशीन खरेदीसाठी ६७:३ मध्ये खरेदी करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत ठरले आहे. मंगळवारपासून हर्सूल, पडेगाव परिसरात कचरा टाकण्यात येईल. सगळी जबाबदारी लोकप्रतिनिधींची नाही. अधिकारी झोपा घेतात का? आम्ही २४ तास काम करतो. आम्ही नोकर व अधिकारी मालक, अशी अवस्था झाली आहे.

Web Title: Aurangabad's trash made 'game'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.