औरंगाबादमध्ये प्रक्रियेच्या आडून कचरा पुरणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:07 AM2018-03-26T00:07:53+5:302018-03-26T00:08:44+5:30

जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.

In Aurangabad, the waste was stopped in the process | औरंगाबादमध्ये प्रक्रियेच्या आडून कचरा पुरणे सुरूच

औरंगाबादमध्ये प्रक्रियेच्या आडून कचरा पुरणे सुरूच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जुन्या शहरात साचलेला कचरा उचलून जिथे जागा मिळेल तेथे नेऊन पुरण्याचे प्रमाण मागील आठ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्यास मनपा अधिकारी व शासन नियुक्त अधिकारी चक्क नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहेत. कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास नागरिकांना विरोध नाही, पण प्रक्रिया करण्याच्या नावाखाली खड्डे करून अक्षरश: कचरा पुरण्यात येत आहे.
मागील ३८ दिवसांपासून शहरात कचºयाची समस्या निर्माण झाली आहे. १३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार करणाºया, ‘क’प्रवर्गातील महापालिकेला हा प्रश्न अद्याप सोडविता आलेला नाही. शासनाने विशेष बाब म्हणून या प्रश्नात लक्ष घातले. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील नऊपेक्षा अधिक अधिकारी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेला देण्यात आले. त्यानंतरही प्रश्न जशास तसा आहे. ज्या ठिकाणी कचºयाचे मोठ-मोठे डोंगर साचले आहेत, तेथे केमिकल फवारणी करण्यात येत आहे. जिथे कचरा कमी आहे, तेथील कचरा उचलून शासकीय, निमशासकीय जागेवर नेऊन पुरण्यात येत आहे. ओला व सुका कचरा एकत्र, त्यात कॅरिबॅग, प्लास्टिक, लोखंड आदी सर्वच साहित्य आहे. रविवारी कडा आॅफिस शेजारी खड्डा करून अक्षरश: कचरा पुरण्याचे काम सुरू होते. परिसरातील नागरिकांनी या अशास्त्रोक्त पद्धतीला विरोध दर्शविला. मनपा आणि शासकीय अधिकाºयांनी चक्क नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. महापालिकेच्या या प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष अधिक वाढू लागला आहे.
अजून एकदाही आंदोलन नाही
कचरा प्रश्नावर अद्याप औरंगाबादकर मौन बाळगून आहेत. नागरिकांनी अजून लोकशाही मार्ग अवलंबला नाही. आज नाही तर उद्या हा प्रश्न मिटेल, अशी आशा बाळगून नागरिक आहेत. मागील एक महिन्यापासून मनपा प्रशासन कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा खरेदी करण्याची निव्वळ घोषणा करीत आहे. अंमलबजावणी मात्र शून्य आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी न लागल्यास नागरिक रस्त्यावर हे निश्चित.
वर्गीकरणास नगरसेवकांचा पाठिंबा नाही
जुन्या शहरातील मनपाचे झोन १,२ आणि ३ मध्ये परिस्थिती अत्यंत विदारक आहे. येथील नगरसेवक ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी मनपाला अजिबात सहकार्य करीत नसल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. नगरसेवकांनी मनावर घेतले तर आठ दिवसांत जुन्या शहरातही शंभर टक्के कचºयाचे वर्गीकरण सहज शक्य आहे.

Web Title: In Aurangabad, the waste was stopped in the process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.