औरंगाबाद : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या श्रीमुखात भडकावणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:05 AM2018-06-23T00:05:48+5:302018-06-23T00:07:07+5:30

संतप्त झालेल्या एका नागरिकाने शिवीगाळ करून भालसिंग यांच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, मारहाण करणाºया तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Aurangabad: The arrest of the Additional Commissioner of the Municipal Commissioner was arrested | औरंगाबाद : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या श्रीमुखात भडकावणाऱ्याला अटक

औरंगाबाद : मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या श्रीमुखात भडकावणाऱ्याला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिडको एन-६ येथील नाल्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना शुक्रवारी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. संतप्त झालेल्या एका नागरिकाने शिवीगाळ करून भालसिंग यांच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली. दरम्यान, मारहाण करणाºया तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
रवी बाबूराव गायकवाड (रा.सिडको), असे मारहाण करणाºया आरोपीचे नाव आहे. गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको एन-६ येथील लक्ष्मीमाता मंदिरापासून जाणारा नाला तुडुंब भरून वाहत होता. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास परिसरातील रहिवासी चेतन रत्नाकर चोपडे (३८, रा.टेलिकॉम हौसिंग सोसायटी, सिडको) हे दुचाकीस्वार बजरंग चौकातून घरी जात होते. त्यावेळी नाल्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते दुचाकीसह नाल्यात वाहून गेले. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी भालसिंग या नाल्याची पाहणी करण्यासाठी गेले असता, परिसरातील नागरिकही जमा झाले. यावेळी तेथे असलेल्या गायकवाडने मनपा अधिकाºयांना शिवीगाळ करून या घटनेचा जाब विचारला. यावेळी भालसिंग हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असतानाच गायकवाडने त्यांच्या श्रीमुखात भडकावली. तेथे उपस्थित असलेले नगरसेवक मकरंद कुलकर्णी, शिवाजी दांडगे, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे यांनी भालसिंग यांना संरक्षण दिले
पोलिसांनी घेतली धाव
याप्रकरणी भालसिंग यांनी आरोपीविरोधात सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी गायकवाडला दुपारी अटक केली, अशी माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सी.बी. ठुबे करीत आहेत.
मनपात निषेध सभा
अतिरिक्त आयुक्त भालसिंग यांना मारहाण झाली. त्यानंतर मनपा अधिकारी, कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून दिवसभर काम केले. सायंकाळी प्रांगणात निषेध सभा घेऊन दोषींवर कारवाईची मागणी आली. आयुक्तानंतरचे मोठे पद असलेल्या अतिरिक्त आयुक्तांना मारहाण झाल्याने विधि सल्लागार अपर्णा थेटे, मुख्य लेखापरीक्षक दीपाराणी देवतराज, डॉ. राणे आदींच्या उपस्थितीत निषेध सभा झाली..

Web Title: Aurangabad: The arrest of the Additional Commissioner of the Municipal Commissioner was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.