क्षुल्लक कारणावरून फौजदाराचे पाडले दात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:07 AM2017-10-15T01:07:36+5:302017-10-15T01:07:36+5:30

रस्त्यात उभी असलेली कार बाजूला घेण्यास सांगणा-या वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. मारहाणीत उपनिरीक्षकाचे तीन दात पडून त्यांना जबर दुखापत झाली

ASI hit by 6 persons | क्षुल्लक कारणावरून फौजदाराचे पाडले दात

क्षुल्लक कारणावरून फौजदाराचे पाडले दात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रस्त्यात उभी असलेली कार बाजूला घेण्यास सांगणा-या वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकास पाच ते सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. मारहाणीत उपनिरीक्षकाचे तीन दात पडून त्यांना जबर दुखापत झाली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की शहर वाहतूक शाखेत कार्यरत असणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप भगवान पाटोळे (५४, रा. रामनगर पोलीस कॉलनी) यांची शुक्रवारी साप्ताहिक सुटी होती. दुपारी दीडच्या सुमारास ते बाजारातून भाजीपाला घेऊन दुचाकीवर घरी जात असताना पाटोळे यांना जैन शाळेच्या मागील बाजूस रस्त्यावर एक ओमनी कार (क्र.एमएच २०, १९५२) उभी असल्याची दिसली. इतर वाहनांना अडथळा होत असल्याने त्यांनी खाली उतरून चालकास कार बाजूला घेण्यास सांगितले.
कारमधील सतीश ताराचंद यादव व संतोष ताराचंद यादव (रा.रामनगर, बालाजी मंदिर) यांनी दिलीप पाटोळे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. अन्य पाच ते सहा जणांनी धावत येऊन पाटोळे यांना काठ्यांनी मारहाण केली. ‘तेरा काम तमाम कर देंगे’ असे म्हणत खिशातील अठराशे रुपये काढून घेऊन ते पळून गेले. मारहाणीत पाटोळे यांचे तीन दात पडले. डोक्याला गंभीर इजा झाली. चेहºयाचे हाड फ्रॅक्चर झाले. मारहाण करणारे ओमनी कारमधून पळून गेले.
या प्रकरणी पाटोळे यांनी शुक्रवारी रात्री सतीश ताराचंद यादव, संतोष ताराचंद यादव यांच्यासह चार महिला व अन्य पाच ते सहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सतीश यादव यास पोलिसांनी शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यास १८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक काकडे तपास करीत आहेत.

Web Title: ASI hit by 6 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.