APMC Election: बीजेपीला सोडत भुमरे एकटे लढले, महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 08:16 PM2023-05-02T20:16:20+5:302023-05-02T20:16:45+5:30

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही

APMC Election: Leaving BJP, Sandipan Bhumre fought alone, Mahavikas Aghadi blew up | APMC Election: बीजेपीला सोडत भुमरे एकटे लढले, महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला

APMC Election: बीजेपीला सोडत भुमरे एकटे लढले, महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला

googlenewsNext

पैठण:  पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखत रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या पॅनलने सर्वच्यासर्व १८ जागा जिंकत महाविकास आघाडीच्या पॅनलचा धुव्वा उडवला. तालुक्यातील सोसायटी व ग्रामपंचायतवर भुमरे यांचे वर्चस्व असताना देखील महाविकास आघाडीने पॅनल उभा केल्याने निकालाची उत्सुकता लागली होती. परंतु मंत्री संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवून तालुक्यावर असलेले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे. 

पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी अनील पुरी व सहाय्यक अधिकारी नितीन वीखे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आली. पहिल्या फेरीपासून मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिवशाही शेतकरी विकास पँनलच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल मापाडी मतदार संघातील सर्वच्या सर्व १८ उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. 

मतमोजणी नुसार राम ऐरंडे, संभाजी तवार, राजेंद्र तांबे, विठ्ठल दोरखे, शरद नरके, बद्रीनाथ बोंबले, सुभाष मुळे, गंगासागर घनवट, शशिकला हजारे, शिवाजी जाधव, साईनाथ होरकटे, हे सोसायटी मतदार संघातून विजयी झाले. ग्रामपंचायत मतदार संघातून राजूनाना भुमरे, सचिन मोगल, मनिषा खराद, कारके भगवान हे विजयी झाले. व्यापारी मतदार संघातून मुकेश काला, व महेश मुंदडा तर हमाल मापाडी मतदार संघातून राजू उत्तमराव टेकाळे हे विजयी झाले. पॅनलच्या दणदणीत विजयानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत जि प सभापती विलास भुमरे, रवींद्र काळे, विनोद बोंबले, रवींद्र शिसोदे, राजेंद्र शिसोदे,  नामदेव खराद, शिवराज भुमरे, राजू भुमरे, शेखर शिंदे, राजू टेकाळे, किशोर चौधरी, भूषण कावसानकर, सुनील हिंगे, नंदलाल काळे, दादा बारे, अण्णासाहेब लबडे, शहादेव लोहारे, संतोष सव्वाशे, संभाजी सव्वासे, गणेश मडके, किशोर तावरे, ईश्वर दगडे, सोमनाथ परळकर, बाबुराव पडुळे, राजू गायकवाड, जालिंदर आडसुळ, संजय कस्तुरे, विष्णू मिटकर आदीसह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

Web Title: APMC Election: Leaving BJP, Sandipan Bhumre fought alone, Mahavikas Aghadi blew up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.