समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 11:56 AM2024-03-09T11:56:29+5:302024-03-09T11:56:50+5:30

टायरची पाहणी करत असताना अचानक ट्रेलरवर पीकअप टेम्पो धडकला

A pickup collided with a trailer on Samriddhi Highway; One died on the spot | समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू

-रऊफ शेख
फुलंब्री: 
समृद्धी महामार्गावर सावंगी शिवारात पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरवर पाठीमागून येणारा पिकअप टेम्पोने धडकून आज पहाटे अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण जखमी आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले आहे

प्राथमिक माहितीनुसार, जालन्याहून समृद्धी महामार्गावरुन छत्रपती संभाजीनगरकडे एक ट्रेलर ( एमएच 21 बीएच 0456) येत होता. सावंगी शिवारात असलेल्या बोगद्यानजीक पेट्रोल पंपावर एका बाजूला ट्रेलर थांबवून चालक शुभम रामराव राठोड ( 30) टायरची पाहणी करत होता. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणारा पिकअप टेम्पो ( एमएच 30 बिडी 6207) ट्रेलरवार धडकला. यात टायरची पाहणी करत असलेला चालक शुभमचा गाडीखाली दबल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस, फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस, तसेच समृद्धी महामार्गाचे आरोग्य पथक घटनास्थळी पोहचले. मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुलंब्री पोलीस स्टेशनचे जमादार पंकज रोहे, राजू तेलंगोटे यांनी पिकअप टेम्पो पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. तर चालक अशोक तळेकर यास ताब्यात घेतले आहे.

Web Title: A pickup collided with a trailer on Samriddhi Highway; One died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.