७ हमीभाव खरेदी केंदे्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:24 AM2017-10-27T01:24:24+5:302017-10-27T01:24:30+5:30

जिल्ह्यात सहा ठिकाणी सीसीआयमार्फत तर एका ठिकाणी पणन महासंघामार्फत कापसाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. एक नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे.

7 cotton Purchasing Centres | ७ हमीभाव खरेदी केंदे्र

७ हमीभाव खरेदी केंदे्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात सहा ठिकाणी सीसीआयमार्फत तर एका ठिकाणी पणन महासंघामार्फत कापसाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. एक नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे.
जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी गुरुवारी जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव व संबंधित अधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. जालना, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन व जाफराबाद या ठिकाणच्या कापूस खरेदी केंद्रावर एक नोव्हेंबरपासून सीसीआयमार्फत हमीभावाने कापूस खरेदीला सुुरुवात करण्यात येणार आहे. तसेच कापूस उत्पादक पणन महासंघाच्या कुंभारपिंपळगाव येथील केंद्रावर हमीभावाने कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. शेतक-यांना हमीभाव केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणण्यापूर्वी आॅनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. संबंधित तालुक्याच्या बाजार समितीमध्ये आॅनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणीसाठी शेतकºयांना कापसाचा पीकपेरा असलेला चालू हंगामातील सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व मोबाईल क्रमांक आवश्यक राहणार आहे. नोंदणी केल्यानंतर शेतक-यांना केंद्रावर कोणत्या दिवशी कापूस विक्रीला घेऊन यायचा, याबाबत मोबाईलवर संदेश पाठविण्यात येणार आहे. ज्या दिवशी कापूस विक्रीसाठी आणायचा संदेश प्राप्त झाला, त्याच दिवशी शेतक-यांनी आपला कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बैठकीस जालना बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले, कापूस पणन महासंघ, वेअर हाऊस कॉर्पोरेशन, खरेदी विक्री संघांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थिती होते.

Web Title: 7 cotton Purchasing Centres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.