धानुरीतील ५२ कुटुंबियांचे उपोषण

By Admin | Published: January 17, 2017 10:53 PM2017-01-17T22:53:09+5:302017-01-17T22:55:23+5:30

लोहारा : तालुक्यातील धानुरी येथील ५२ लोकांच्या राहत्या घराच्या ग्रामपंचायत रेकॉर्डच्या नोंदी रद्द कराव्यात, असा आदेश गटविकास अधिकारी यांनी धानुरी ग्रामपंचायतीला दिला आहे.

52 family members of fasting in Dhanuriya | धानुरीतील ५२ कुटुंबियांचे उपोषण

धानुरीतील ५२ कुटुंबियांचे उपोषण

googlenewsNext

लोहारा : तालुक्यातील धानुरी येथील ५२ लोकांच्या राहत्या घराच्या ग्रामपंचायत रेकॉर्डच्या नोंदी रद्द कराव्यात, असा आदेश गटविकास अधिकारी यांनी धानुरी ग्रामपंचायतीला दिला आहे. सदरील आदेशाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, आश्वासनानंतर हे आंदोलन रात्री उशिरा मागे घेण्यात आले.
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील जवळपास ५२ कुटुंबियांच्या राहत्या घराच्या ग्रामपंचायत रेकॉर्डवरील नोंदी रद्द करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, सदरील आदेश रद्द करण्यात यावेत, अशी मागणी संबंधित कुटुंबियांकडून मागील काही दिवसांपासून करण्यात येत होती. परंतु, प्रशासनाकडून कुठल्याही स्वरूपाची कारवाई झाली नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. वारंवार पाठपुरवा करूनही काहीच फायदा होत नसल्याचे समोर आल्यानंतर अखेर संबंधित कुटुंबियांनी आंदोलनाची भूमिका घेत मंगळवारपासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळणार नाही, तोवर आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
सदरील उपोषणात बाजार समितीचे उपसभापती अंगद सुरवसे, नितीन सूर्यवंशी, श्रीमंत साळुंके, लकुळा घोडके, महेबूब शेख, चाँद शेख, लालबी शेख, आब्बास शेख, श्रीधर जाधव,सतिश बाबर, विजय साळुंके, प्रभावती साळुंके, तानाजी साळुंके, लक्ष्मी साळुंके, नारायण साळुंके, शितल साळुंके, शहाजी सुरवसे, जयश्री सुरवसे, नागेश यादव, मिना यादव, शिवाजी मुसांडे, रुक्मीणबाई मुसांडे, वामन लक्ष्मण शिंदे, कौशल्या शिंदे, दैवशाला बाबर, बालाजी बाबर, शेषेराव सूर्यवंशी, उषा सुर्यवंशी, सुकुमार मुसांडे, विष्णू साळुंके, मीना साळुंके, सुमन चव्हाण आदी सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: 52 family members of fasting in Dhanuriya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.